सातारा : येथील ओंकार शामराव शिंदे या युवकाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पंचवीस हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या वनविभागाच्या वनपाल योगेश गावित, वनसंरक्षक महेश सोनवले, रणजित काकडे व किशोर ढाणे या चौघांचे अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारी कोर्टाने फेटाळून लावले. बोरगाव पोलीस या फरार चौघांचा शोध घेत आहेत.
३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी शिवारातील पिकांचे माकडांपासून रक्षण करण्यासाठी गेलेल्या ओंकार शिंदे या युवकाला वनविभागाच्या चार कर्मचाऱ्यांनी पकडून त्याला शिकारीच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. यावेळी त्याला मारहाण करून त्याच्याकडून कोऱ्या कागदावर सह्या घेऊन हाताचे ठसेही घेतले व त्याच्याकडे एक लाख रुपयांची मागणी करत त्याच्या कुटुंबियांकडून पंचवीस हजार रुपये उकळले होते.
५ सप्टेंबरला या घटनेची फिर्याद ओंकार शिंदे याने बोरगाव पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी वनपाल योगेश गावित, वनसंरक्षक महेश सोनवले, रणजित काकडे व किशोर ढाणे यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून हे चारही वनकर्मचारी पोलिसांना गुंगारा देत आहेत. त्यांनी सातारा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
या अर्जावर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश शरद पवार यांचे कोर्टात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. यावेळी सहाय्यक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता मिलिंद ओक यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, प्रथमदर्शनी त्यांनी खंडणी मागितली आहे. तसेच टेलिफोन कनेक्टिव्हिटी आहे. जे साक्षीदार आहेत त्यांनी सर्वांनी वर्गणी स्वरूपात पैसे गोळा करून खंडणी देण्यासाठी दिले आहेत. खंडणी घेतल्याचे दिसत आहे. वनपाल योगेश गावित व वनरक्षक महेश सोनवले हे दोघे गुन्ह्यात सहभागी आहेत.
वनविभागाचा दाखल गुन्हा हा २४ तासाचे आत रजिस्टर होऊन तो वनपरिक्षेत्र अधिकारी यांचेकडे जाणे गरजेचे आहे मात्र तसे झालेले नाही. तसेच गावित हे स्वतः वनपाल असल्याने त्यांनी स्वतःच्या बचावाकरीता खोटी कागदपत्रे तयार केली आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल राठोड यांनी सपोनि डॉ. सागर वाघ यांना खोटी माहिती दिली होती.जो कायदा यापूर्वी संपुष्टात आला आहे आणि नवीन कायदा लागू झाला आहे. त्यात त्यांनी खोटी माहिती दिल्याचे दिसत आहे. तसेच खंडणीची रक्कम वसुल होणेकामी या दोघांनाही पोलीस कस्टडी मिळणे गरजेचे असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.
यावेळी बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि डॉ. सागर वाघ यांची भूमिका महत्वाची ठरली. त्यांनी या गुन्ह्याचा तपास स्वतःकडे घेऊन योगेश गावित प्रकरणातील कोल्हापूर ते सातारा वनविभाग इथ पर्यंतची सर्व कागदपत्रे त्यांनी स्वतःच गोळा केली. न्यायालयात देखील त्यांनी स्वतः हजर राहून या प्रकरणाची बाजु मांडली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |