अजित जगताप
सातारा : खटाव तालुक्यातील वडूज मध्ये कोणत्याही राजकीय पक्षांना सत्तेसाठी बहुमत मिळाले नाही. त्यामुळे अपक्ष सह वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसच्या मतांवर सत्तेचा तराजू झुकू शकतो. यासाठी भाजप प्रयत्न शील असल्याची चर्चा होत आहे. गेल्या वेळी राष्ट्रवादी व भाजप ची सत्ता होती. यावेळी भाजपा-६, राष्ट्रवादी काँग्रेस-५, काँग्रेस -१, अपक्ष -४, वंचित आघाडी -१ असे एकूण १७ उमेदवार निवडून आले आहेत.
वडूज नगरपंचायत विजयी उमेदवार व पक्ष पुढीलप्रमाणे-
राष्ट्रवादी मधून प्रभाग १ आरती काळे, १० शोभा वायदंडे, १३ स्वप्नाली गोडसे, १४ सुनिल गोडसे, १५ रोशना गोडसे व अपक्षमधून 2 मनीषा काळे, 3 राधिका गोडसे, ४ मनोज कुंभार आणि वंचित बहुजन आघाडीचे ५ शोभा बडेकर व १२ मध्ये काँग्रेसचे अभय देशमुख विजयी झाले आहेत. या वेळी भाजपने पूर्ण ताकद लावून निवडणूक लढवली होती. भाजप मधून ६ रेखा माळी, ७ रेश्मा बनसोडे, ८ सोमनाथ जाधव, ९ बनाजी पाटोळे, ओंकार चव्हाण, १६ जयवंत पाटील असे विजयी झाले. प्रभाग १७ मध्ये मतदान नसतानाही याठिकाणी अपक्ष उमेदवार सचिन माळी विजयी झाले. त्यांच्या विरोधात गोडसे भावकीमध्ये एकीकरण झाले होते. 'एक मराठा लाख मराठा' सोशल मीडियावर पोष्ट व्हायरल करण्यात आली होती. त्याचा परिणाम झाला नाही असेच नमूद करावे वाटते. रिपाइं आठवले गटाच्या दोन कार्यकर्त्यांच्या अंतर्गत वादाचा फायदा प्रभाग क्रमांक १० मध्ये राष्ट्रवादी ला झाला. अवघ्या पाच मतांनी उमेदवार विजयी झाले. विजयानंतर फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीने वडूज नगरपंचायत मध्ये प्रस्थापित मंडळींना धक्का दिला आहे, हे या निवडणुकीचे वैशिष्ट ठरले आहे.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |