08:55pm | Jun 22, 2022 |
सातारा : विधान परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन गुजरातला गेले. तेथून ते गुवाहाटी येथे गेल्याची माहिती आहे. त्यांच्यासोबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हेही आहेत.
एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्य सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत आहे. अशात बुधवारी ता. २२ सायंकाळी ५ वाजता शिवसेनेतर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शंभूराज देसाई यांना नोटीस पाठवून या बैठकीला हजर राहण्यास सांगितले आहे. पक्षाच्या बैठकीला हजर राहा नाही तर पक्ष सोडा, असा इशारा नोटीसमधून देण्यात आला आहे.
राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी बुधवारी वर्षा बंगला, माऊंट प्लेझंट रोड, मुंबई ४००००६ येथे सायंकाळी ५ वाजता तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस आपली उपस्थिती आवश्यक आहे याची नोंद घ्यावी. ही सूचना आपण महाराष्ट्र विधानसभेत नोंदणी केलेल्या ई-मेल पत्यावर पाठविली आहे. तसेच याची माहिती व्हॉट्स ॲप व एसएमएसद्वारेही कळविली आहेत, असे पत्रातून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना कळविण्यात आले.
बैठकीस लिखित स्वरूपात वैध आणि पुरेशी कारणे प्रदान केल्याशिवाय आपणास अनुपस्थित राहता येणार नाही. बैठकीला उपस्थित न राहिल्यास आपण स्वेच्छेने शिवसेना पक्षाच्या सदस्यत्व सोडण्याचा तुमचा स्पष्ट इरादा आहे असे मानले जाईल.
परिणामी आपणावर भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रते संदर्भात असलेल्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असेही पत्रात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना कळविण्यात आले आहे. हे पत्र मुख्य प्रनोत शिवसेना विधिमंडळ पक्ष सुनील प्रभू यांच्या स्वाक्षरीने पाठविण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |