10:38pm | Sep 26, 2022 |
सातारा : दोनच दिवसांपूर्वी माझी सातारा आणि ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर आज सातारा येथे जिल्ह्याची आढावा बैठक घेतली आहे. दि. ३० सप्टेंबर रोजी सप्टेंबर रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीमध्ये नियोजन समितीमार्फत उपलब्ध असलेल्या निधीतून पुढील सहा महिन्यात जिल्ह्यातील विकास कामे मार्गी लावण्यावर आपला भर राहील, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज सातारा येथे पत्रकार परिषदेत दिली. कास पठारावर झालेल्या अतिक्रमणा संदर्भात आलेल्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी यांना वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या असून अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मी त्याच्यावर भाष्य करीन, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सातारा जिल्ह्यातील पत्रकार संघटनांच्या वतीने शंभूराजे यांचा येथील शासकीय विश्रामगृहामध्ये सत्कार करण्यात आला. त्यावेळी पत्रकारांशी देसाई यांनी मनमोकळा संवाद साधला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, शिंदे- फडणवीस सरकार सत्तेवर येऊन सहा महिने झाले आहेत. राज्यभरात पालकमंत्री पदाच्या नियुक्ती करण्यात आल्या असून सातारा व ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी माझी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आज जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हा नियोजन समितीला प्राप्त झालेला सर्व निधी खर्च करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून पुढील सहा महिन्यात नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे हाती घेण्यात येतील. जिल्ह्यातील दरडप्रवण आणि भुस्लखन प्रवण क्षेत्राबाबत कॅबिनेटच्या बैठकीत काही चांगले निर्णय झाले असून गतवर्षी ज्या तालुक्यांमध्ये नुकसान झाले आहे त्या ठिकाणांचे निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. निधी राज्य शासन उपलब्ध करून देईल.
जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर, कास, बामणोली, कोयनानगर ही प्रामुख्याने पर्यटन स्थळे म्हणून ओळखली जातात. त्या ठिकाणचा पर्यटन आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत असे सांगून ना. शंभूराज देसाई पुढे म्हणाले जलसंपदा विभागासंदर्भात शेतीचे अनेक प्रश्न आहेत. सातारा येथील औद्योगिक वसाहतीमधुन अनेक उद्योग बाहेर गेले आहेत. ग्रामीण भागात रस्त्यांची समस्या आहे. जिल्ह्यातील दहा पैकी आठ तालुके डोंगरी प्रवण म्हणून ओळखले जातात त्यांच्याही काही समस्या आहेत. याकडे अधिक लक्ष देणार आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ समिती, उपसमितीच्या सातत्याने बैठका सुरू आहेत. सातत्याने त्याच्यावर चर्चा होत आहेत. मराठा आरक्षणाबाबत शिंदे - फडणवीस सरकार अत्यंत सकारात्मक आहे. सातारा तालुक्यातील कास पठारावर करण्यात आलेल्या अतिक्रमणासंदर्भात ना. शंभूराज देसाई यांना छेडले असता ते म्हणाले, जिल्हाधिकारी यांना कास पठाराचा दौरा करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्हाधिकारी सध्या शासकीय कामानिमित्त नवी दिल्ली येथे असून त्यांचा अहवाल आल्यानंतर त्याचे अवलंबून करून नंतरच त्याच्यावर भाष्य करणे अधिक योग्य ठरेल. आ. संतोष बांगर यांच्या कुटुंबीयांवर झालेला हल्ला हा अत्यंत भ्याड असाच होता. त्या संदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस संबंधितांवर निश्चितपणे कारवाई करतील असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
तडवळे सं. वाघोली येथील स्टोन क्रशर बंद करा |
मोबाईलची चोरी |
सुमारे साडेसात लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
गाडीच्या बॅटऱ्यांची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
धक्काबुक्की केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल |
दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून बॅटर्यांची चोरी |
शॉक लागून एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
8 कोटी 3 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी 19 जणांवर गुन्हा |