12:45pm | Apr 11, 2021 |
सातारा : फलटणमध्ये गोवंशाची कत्तल करणार्या पाचजणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळावरुन 650 किलो जनावरांचे मास, 40 लहान जर्शी गाईची वासरे, टाटा कंपनीचा 407 टेम्पो (क्र.एमएच 20 एफ- 6788), पांढर्या रंगाची इनोव्हा कार (क्र. एमएच 01 व्ही- 9860), इलेक्ट्रॉनिक वजन काटा, दोन मोबाईल हँडसेट असा एकूण 32 लाख 83 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, फलटण येथील आखरी रस्ता कुरेशी नगर, फलटण येथे जाकीर कुरेशी यांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये वाजिद जाकीर कुरेशी, इलाही हुसेन कुरेशी, गौस रहीम कुरेशी, तौसिफ अनिस कुरेशी, अरबाज नियाज कुरेशी सर्व रा. मंगळवार पेठ, फलटण हे अवैधरित्या जनावरांची कत्तल करीत असताना मिळून आलेले आहेत. त्यांच्या येथे एकूण 40 वासरे दाटीवाटीने गाडीत भरलेल्या स्थितीत मिळून आली. पोलीस येण्याची चाहूल लागताच तौसिफ कुरेशी व अरबाज कुरेशी यांना पळून जाण्यात यश आलेले आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. घटनास्थळी 650 किलो जनावरांचे मास, 40 लहान जर्शी गाईची वासरे, टाटा कंपनीचा 407 टेम्पो (क्र.एमएच 20 एफ- 6788), पांढर्या रंगाची इनोव्हा कार (क्र. एमएच 01 व्ही- 9860), इलेक्ट्रॉनिक वजन काटा, दोन मोबाईल हँडसेट असा एकूण 32 लाख 83 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असल्याची माहिती फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी दिली.
आज दि. 11 रोजी कुरेशी नगर, फलटण येथे जाकीर कुरेशी याच्या घराच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे फलटण शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने याठिकाणी धाड टाकून महाराष्ट्र प्राणी संरक्षण व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्याच्या अन्वये वाजिद जाकीर कुरेशी, इलाही हुसेन कुरेशी, गौस रहीम कुरेशी, तोसीब अनीश कुरेशी, अरबाज नियाज कुरेशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबतची फिर्याद पो.कॉ. सांडगे यांनी नोंदवली.
ही कारवाई फलटणचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, सपोनि नवनाथ गायकवाड, सचिन रावळ, सपोफौ शिंदे, पो. ना. करपे, घाटगे, खाडे, येळे, जाधव, भिसे, होमगार्ड हिवरकर, गोसावी यांनी केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन रावळ करीत आहेत.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |