05:25pm | Oct 15, 2020 |
सातारा: वाहनाचा धक्का लागल्याचा बहाणा करून लुटमार करणारा अट्टल गुन्हेगारास सातारा तालुका पोलिसांनी जेरबंद केले. वाढे फाटा ते फलटण जात असताना डम्पर चालकास दम बाजी करून लुटमार करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी अट्टल गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. अविनाश विलास दडस ( रा. आरफळ ता. जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. 12ऑक्टोबर 2020 रोजी डम्पर चालक हा वाढे फाटा ते फलटण रोडने डम्पर घेवून जात असताना आरफळ ता.जि. सातारा गावचे हद्दीमध्ये डम्पर हा एअर पकडलेने बंद पडलेला होता. त्यावेळी एका छोटा टेम्पो तेथे थांबला. त्यामधील चालकाने त्या डम्पर चालकास तु काही दिवसापूर्वी माझ्या गाडीला धडक दिली होती. तू माझ्या मालकाला भेटायला चल असे म्हणाला. डम्पर चालकाने माझ्याकडून कोणताही अपघात झालेला नाही असे सांगितले तरी देखील खात्री करण्यासाठी त्या चालकासोबत मालकास भेटण्यास जावू असे सांगितले. त्यावेळी टेम्पो चालकाने त्याचे टेम्पोमध्ये बसून चडूथ (ता.जि. सातारा) गावचे हद्दीमध्ये एक कॅनलवर निर्जनस्थळीं घेवून गेला. त्या ठिकाणी टेम्पो चालकाने डंम्पर चालकाचे खिशातील पैसे जबरदस्तीने काढू लागल्यावर डंम्पर चालकाने त्यास विरोध केला. परंतू टेम्पो चालकाने डंम्पर चालकाने जबरदस्ती करून झटापट करून डंम्पर चालकाचे खिशातील दोन हजार रूपये घेवून टेम्पो घेवून पळून गेला.
त्याबाबत बाळकृष्ण दत्तात्रय भुजबळ (रा. झणझणे सासवड ता. फलटण जि. सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाणेस तक्रार दिली होती. दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान, सातारा डी.बी. पथकाने फिर्यादीकडून आरोपीबाबत कौशल्यपूर्वक माहिती घेवून आरोपीचे वर्णन प्राप्त केले. वर्णनावरून या गुन्हयाचे चौकशी करीता अविनाश विलास दडस( रा. आरफळ ता. जि. सातारा) या संशयितास ताब्यात घेतले. हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर लुटमारीचे विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.सध्या तो तडीपार कालावधी संपलेला असल्याने त्याचे गावी आलेला होता. दडस हा अत्यंत सराईत गुन्हेगार असल्याने त्याने पोलीसांना प्राथमिक चौकशीमध्ये उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतू पोलीसांनी केलेल्या प्रश्नाचे अडीमारापुढे तो बोलता झाला व त्याने सदर केलेल्या गुन्हयाची कबुली दिली.
ही कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधिक्षक सातारा आंचल यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सजन हंकारे पोलीस, डी.बी.पथकातील पो.हवा. दादा परिहार, पो.ना. सुजीत भोसले, पो.कॉ. सागर निकम, पो.कॉ. सतीश पवार, पो.कॉ. नितीराज थोरात,पो.कॉ. संदीप कुंभार, पो.ना. निलेश जाधव, पो.ना. ओंकार यादव, पो.ना. अमित माने यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास पो.उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी हे करीत आहेत.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |