12:56pm | Sep 28, 2020 |
पुसेगाव : पुसेगाव (ता.खटाव) येथील जल्लोषात साजरा होणार्या नवरात्र उत्सवाला कित्येक वर्षांनंतर ब्रेक लागला आहे. यंदा प्रथमच ‘एक गाव एक दुर्गा’ हा उपक्रम पुसेगाव येथे राबविण्यात येणार आहे. तर गावातील सर्वच नवरात्रोत्सव मंडळांच्या वतीने नवरात्रात होणार्या खर्चाला फाटा देऊन येथील कोविड केअर सेंटरला सुमारे अडीच लाख रुपये किंमतीच्या ऑक्सिजन मशिन भेट देण्यात येणार आहेत.
पुसेगाव हे खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील मोठ्या लोकसंख्या असणारं व पंचक्रोशीतील वाड्या वस्त्या व लहान गावांची मुख्य बाजारपेठ आहे. या गावात सुमारे 14 मंडळ नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. नऊ दिवस सर्वच मंडळांच्यावतीने सादर करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांना तरुण मंडळी, महिला व भाविक हजेरी लावत असतात. विसर्जनादिवशी ढोल-ताशा, डॉल्बी, बँडच्या तालावर नाचणार्याची मज्जा पाहण्यासाठी दुर्गा देवीच्या मिरवणुकीला आसपासच्या गावातील हजारो तरुण मंडळी हजेरी लावत असतात. त्यामुळे पोलीस प्रशासनावर प्रचंड ताण पडतो.
मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुसेगावातील नवरात्र उत्सव साजरा करणार्या सर्वच मंडळांच्या पदाधिकार्यांनी आज पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या समवेत पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत यावर्षी ‘एक गाव एक दुर्गा’ हा उपक्रम राबविण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला. ऐवढेच नाहीतर लाखो रुपयांची उधळण न करता पुसेगाव येथे असलेल्या कोविड केअर सेंन्टरला 10 ऑक्सिजन मशीन देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यावर्षी येथील श्री सेवागिरी मंदिरात एकाच देवीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार असून मठाधिपती प.पू. सुंदरगिरी महाराज हेच नवरात्रीच्या काळात सर्व पूजा अर्चा करणार आहेत.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, सपोनि विश्वजित घोडके, रणधीर जाधव, सुनिलशेठ जाधव, बाळासाहेब जाधव, विकास जाधव, बाबू जाधव, सुरज जाधव, चंद्रकांत जाधव यांच्यासह विविध नवरात्र मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता पुसेगावसारख्या मोठ्या गावात युवा पिढीने सामाजिक बांधिलकी जोपासत ‘एक गाव एक दुर्गा’ हा उपक्रम राबविण्यासाठी घेतलेला निर्णय निश्चितच कौतुकास्पद असून या गावचा आदर्श इतरांनी घ्यावा व पुसेगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील इतर मंडळांनी साठलेल्या रक्कमेचा काही भाग नागरिकांच्या आरोग्यासाठी कोणत्याही स्वरूपात दान द्यावे.
- विश्वजित घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पुसेगाव.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |