सातारा : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत चालला असून आज भल्या सकाळी सातार्यातील बाधितांनी पन्नाशी पार केली असून आज रात्री उशिरा कोरोनाचे नव्याने 28 रुग्ण निष्पन्न झाल्याने 24 तासांत जिल्ह्यात कोरोनाचे 80 रुग्ण सापडले आहेत. तसेच दिवसभरात कोरोनाने पाचजणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील कोरोना केअर सेंटर, जिल्हा रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालयांमध्ये अनुमानित म्हणून दाखल असलेल्या तब्बल 52 जणांचे कोरोना रिपोर्ट आज सकाळीच पॉझिटिव्ह आले होते. तसेच तिघा बाधितांचा मृत्यू झाला होता. आज रात्री उशिरा पुन्हा 28 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यात एकाच दिवसात कोरोनाची बेरीज 80 वर पोहोचली असून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 422 वर पोहोचली आहे. दिवसभरात 5 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 14 वर पोहोचली आहे.
आज सकाळी निष्पन्न झालेल्या कोरोना बाधितांची तालुकानिहाय आकडेवारी - माण तालुक्यातील म्हसवड येथील 48 वर्षीय पुरुष, तोंडले येथील 58 वर्षीय पुरुष, भालवडी 62 वर्षीय पुरुष (मृत्यु), लोधवडे येथील 34 वर्षीय व 28 वर्षीय महिला. खटाव तालुक्यातील वांझोली येथील 52 वर्षीय पुरुष व अंभेरी येथील 14 वर्षीय युवक. सातारा तालुक्यातील खडगाव येथील 48 वर्षीय पुरुष, जिमनवाडी येथील 21 वर्षी युवक कुस बुद्रुक 45 वर्षीय महिला. वाई तालुक्यातील आकोशी येथील 58 वर्षीय पुरुष, आसले येथील 40 वर्षीय पुरुष, मालदपूर येथील 24 वर्षीय पुरुष, देगाव येथील 55 वर्षीय महिला, सिद्धनाथवाडी येथील 25 वर्षीय पुरुष, धयाट येथील 52 वर्षीय पुरुष. पाटण तालुक्यातील धामणी येथील 35 वर्षीय पुरुष, 62 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय पुरुष जांभेकरवाडी 70 वर्षीय महिला, गमलेवाडी येथील 31 वर्षीय पुरुष, मन्याचीवाडी येथील 20 वर्षीय युवक, मोरगिरी येथील 58 वर्षीय पुरुष व 72 वर्षीय महिला, आडदेव येथील 35 वर्षीय पुरुष. खंडाळा तालुक्यातील अंधोरी येथील 72 वर्षीय पुरुष व 8 वर्षीय मुलगा, घाटदरे येथील 47 वर्षीय महिला, पारगाव येथील 27 वर्षीय पुरुष, 62 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय महिला, 50 वर्षीय दोन पुरुष, 25 वर्षीय पुरुष, 78 वर्षीय पुरुष. जावली तालुक्यातील सावरी येथील 39 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला व 7 वर्षांची मुलगी, केळघर येथील 16 वर्षीय युवक 44 वर्षीय पुरुष. महाबळेश्वर तालुक्यातील कासरुड येथील 26 वर्षीय पुरुष व 18 वर्षी युवक, देवळी येथील 9 वर्षाचा मुलगा, 42 वर्षीय पुरुष व एक महिला, गोळेवाडी येथील 42 वर्षीय महिला. कराड तालुक्यातील खराडे येथील 45 वर्षीय महिला व 55 वर्षीय पुरुष, म्हासोली येथील 20 वर्षीय युवती. फलटण तालुक्यातील सस्तेवाडी येथील 21 वर्षीय महिला.
तसेच आज रात्री उशिरा सातारा जिल्ह्यातील 28 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील वाई तालुका- जांभळी 1, आसले 2, वेरुळी 1, कोंडावळे 1, किरोंडे 1, वडवळी 1, वाई ग्रा. रुग्णालय 1.
महाबळेश्वर तालुका - देवळी 2, पारुट 3, गोरोशी 1.
जावली तालुका - तोरणेवाडी 1, बेलवडे 1 (मृत).
खटाव तालुका - बनपुरी 1, वांझोळी 1, डांभेवाडी 2.
सातारा तालुका - वावदरे 1.
कराड तालुका - शेणोली स्टेशन 7.
आज रात्री उशिरा 28 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे सकाळी निष्पन्न झालेल्या 52 जणांसह जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 422 झाली आहे, तर आज दिवसभरात 5 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून 282 कोरोना बाधितांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |