04:30pm | Sep 27, 2022 |
मुंबई : मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम वाढला आहे. सक्तवसुली संचलनालयाने संजय राऊत यांना पीएमएलए कायद्याअंतर्गत अटक केली. आताच्या घडीला संजय राऊत आर्थर रोड तुरुंगात असून, हा मुक्काम वाढला आहे. कारण संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी १० ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
संजय राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला असून, यावरील सुनावणी विशेष पीएमएलए न्यायालयात सुरू आहे. पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊतच मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप ईडीने केला आहे. या सुनावणीवेळी संजय राऊत हे न्यायालयात उपस्थित होते. यावेळी संजय राऊत यांच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाला. यानंतर ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली.
पुढील सुनावणीवेळी ईडीच्या बाजूने युक्तिवाद केला जाणार
संजय राऊतांच्या जामीन अर्जावरील पुढील होणाऱ्या सुनावणीवेळी ईडीच्या बाजूने युक्तिवाद केला जाणार आहे. न्यायालयाने १० ऑक्टोबरपर्यंत या प्रकरणातील सुनावणी पुढे ढकलली आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा यंदाचा दसरा हा न्यायालयीन कोठडीचत जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तत्पूर्वी, यापूर्वी झालेल्या सुनावणीतही ईडीने संजय राऊत यांच्या जामीनाला जोरदार विरोध दर्शवला होता.
दरम्यान, पत्राचाळीच्या १०३९ कोटी रुपयांच्या या गैरव्यवहारात राऊत यांचा थेट सहभाग असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. तसेच संजय राऊत हे प्रभावशाली राजकीय नेते आहेत. त्यामुळे तुरुंगातून बाहेर आल्यास राऊत साक्षीदारांवर दबाव आणू शकतात. त्यामुळे संजय राऊत यांना जामीन देऊ नये, असे ईडीने म्हटले होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |