पुसेगाव: प्रलंबित शासकिय अकृषिक आकारणीबाबत विचारणा केल्याचा राग आला म्हणून सागर राजेंद्रकुमार नवाळे (रा.पुसेगाव, ता.खटाव) याने सुरेश काशिनाथ कंठे (वय 36, रा.पुसेगाव) या कोतवालास शिवीगाळ करून मारहाण केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी (दि.26) मनीषा संजय नवाळे (रा.पुसेगाव ता. खटाव) या आपल्या मुलीच्या शिक्षणकामी उत्पन्नाचा दाखला घेण्यासाठी पुसेगाव तलाठी कार्यालयात गेल्या होत्या. त्यावेळी कोतवाल सुरेश कंठे यांनी प्रलंबित शासकीय अकृषिक आकारणी भरल्यानंतर दाखला देण्यात येईल असे सांगितले. तरीदेखील मारुती नवाळे यांच्या विनंतीवरून सदरचा दाखला कंठे यांनी तलाठी अमोल बोबडे यांचेकडून घेऊन दिला.
मात्र मंगळवार दि.27 रोजी सकाळी 9:45 सुमारास कंठे कार्यालयात दैनंदिन कामकाज करत असताना सागर राजेंद्रकुमार नवाळे (रा.पुसेगाव, ता.खटाव) तेथे आला आणि मारुती ज्ञानोबा नवाळे यांचे शासकीय अकृषिक आकारणी पावतीचे पैसे किती आहेत व एवढे पैसे कसे अशी विचारणा केली. कंठे यांनी आकारणी बाबतची पूर्ण माहिती नवाळे यांना दिली. परंतु, त्याने सदरची बाब ऐकून न घेता कोतवाल कंठे यास शिवीगाळ करून खुर्चीने मारहाण केली तसेच धमकी दिली. यात कंठे यांच्या डाव्या हाताला व पायाला दुखापत झाली असून याबाबतची फिर्याद पुसेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |