नवी दिल्ली : देशात दिवाळीचे स्वागत होत असताना पाकिस्तानने सीमेवर भ्याडपणे शस्त्रसंधीचे उल्लंघन (ceasefire violation) करत विविध भागात गोळीबार केला. यात भारताचे ३ जवान शहीद झाले, तसेच ३ नागरिकही ठार झाले. पाकच्या या कृत्याचे भारतीय लष्कराने सडेतोड उत्तर दिले. भारताच्या या कारवाईत पाकिस्तानचे ७ ते ८ सैनिक मारले गेले आहेत. मारल्या गेलेल्या पाकिस्तानच्या सैनिकांमध्ये २ ते ३ पाकिस्तानी एसएसजी कमांडोंचाही समावेश आहे, अशी माहिती भारतीय लष्कराने दिली.
भारतीय लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याने केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे कमीतकमी १० ते १२ सैनिक जखमी झाले आहेत. या बरोबरच भारताच्या या कारवाईत पाकिस्तानी बंकर ईंधन डंप आणि लॉन्च पॅड नष्ट झाले आहे.
उरी सेक्टरमध्ये नंबाला येथे भारताचे तीन जवान शहीद झाले. हाजी पीर सेक्टरमध्ये एका बीएसएफ इन्स्पेक्टरने देखील जीव गमावला.बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्येच कामलकोटे येथे तीन नागरिक ठार झाले आहेत. यांपैकी एक महिला हाजी पीर सेक्टरच्या बालकोटे येथे मारली गेली. पाकिस्तानच्या या गोळीबारामध्ये अनेक नागरिक जखमी झाले आहेत.
गोळीबार सुरू करून घुसखोरीचा प्रयत्न
उरीतील अनेक ठिकाणांव्यतिरिक्त बांदीपोरा जिल्ह्यात गुरेज सेक्टरच्या इजमर्ग आणि कुपवाजा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. लष्कराने केरन सेक्टरमध्ये गोळीबार करत घुसखोरी करण्याचा पाकचा प्रयत्न हाणून पाडला, असे संरक्षण विभागाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले. केरल सेक्टरच्या LOC वरील फॉरवर्ड पोस्टवर आमच्या जवानांनी काही संशयित हालचाली पाहिल्या. त्यानंतर सतर्क असलेल्या जवानांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला.
भारतीय जवानांनी पाकचे बंकर, ईंधन डंप आणि लॉन्च पॅड केले नष्ट
पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत तोफगोळे आणि इतर हत्याराचांही वापर केला. मात्र भारतीय जवानांनी पाकला जशासतसे उत्तर दिले. या कारवाईत भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याचे बंकर, ईंधन डंप आणि लॉन्च पॅड उद्ध्वस्त केले, अशी माहिती प्रवक्त्याने दिली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |