05:08pm | May 27, 2020 |
नवी दिल्ली: देशभरात ठिकठिकाणी अडकलेल्या प्रवासी मजुरांच्या दुर्दशेबाबत चिंता व्यक्त करत मंगळवारी सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली. केंद्र सरकार व राज्यांना नोटीस देत गुरुवारपर्यंत म्हणणे मागवले. पुढील सुनावणीही त्याच दिवशी होईल. कोर्टाने म्हटले की, मजुरांसाठीची सरकारी व्यवस्था अपुरी आहे. त्यांना घरापर्यंत पोहोचवण्यासाठी मोफत प्रवास, निवास व भोजनाची तत्काळ व्यवस्था करणे आवश्यक आहे.
प्रसारमाध्यमांतील वृत्त आणि मिळणार्या पत्रांची स्वत:हून दखल घेत कोर्टाने ही सुनावणी सुरू केली आहे. पीठाने म्हटले की, पायी जाणार्या मजुरांच्या दयनीय स्थितीच्या बातम्या येत आहेत. मार्गावर त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था नसल्याच्याही तक्रारी आहेत. अशी स्थिती हाताळण्यासाठी ठोस उपाय हवेत. सुप्रीम कोर्टाने 15 मे रोजी मजुरांच्या स्थलांतराशी संबंधित याचिका फेटाळली होती. औरंगाबादच्या दुर्घटनेचा उल्लेख करत कोर्टाने म्हटले होते की, मजूर रात्री रुळावर झोपतील, तर कसे थांबवता येईल ? रस्त्यांवर चालणार्या मजुरांवर लक्ष ठेवणे शक्य नाही.
केंद्राने सुप्रीम कोर्टात सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात कामगारांच्या वेतन कपातीचे स्वातंत्र्य कंपन्यांना आहे. उद्योगांच्या याचिकेवर सरकारने हे उत्तर दिले. आता लघुउद्योगांविरुद्ध दंडात्मक कारवाईवरील अंतरिम बंदी जारी राहील.
बुधवारी 117 रेल्वेंतून एक लाख 93 हजार स्थलांतरित कामगार बिहारच्या विविध जिल्ह्यांत पोहोचतील. 3 मेपासून आतापर्यंत 15 लाख मजूर रेल्वेंतून बिहारला आले आहेत. रेल्वेने म्हटले की, आतापर्यंत 44 लाख मजुरांना घरी पोहोचवण्यात आले आहे.
मुंबईतील मोठा हॉटस्पॉट धारावी आता रिकामी होत आहे. मंगळवारी यूपी, बिहारला जाण्यासाठी हजारो लोकांना रांगा लावल्या. मात्र, बहुतेकांना रेल्वेत जागा मिळाली नागी. काही तासांनंतर ते वस्तीकडे परतले.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |