03:12pm | Sep 25, 2020 |
सातारा: मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासह मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करा अशी मागणी ठोसेघर पठार स्थित सध्या रा. कांदिवली पूर्व (मुंबई ) येथील मराठी क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाने विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, की सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणअंतर्गत शासकीय नोकर भरती आणि शैक्षणिक प्रवेशाबाबत स्थगिती देण्यात आली असून त्यामुळे मराठा समाजात तीव्र नाराजी पसरली आहे. या निर्णयाच्या विरोधात न्याय्य मागण्याकरिता ठिकाणी मराठी समाज आंदोलन करत आहे. पोलीस भरतीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणांतर्गत असलेल्या राखीव जागांचा कोटा ठेवूनच राज्य सरकारतर्फे पोलीस भरती करण्यात यावी, अन्यथा स्थगिती मिटेपर्यँत पोलीस भरती थांबवण्यात यावी. इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेत मराठा समाजाला हक्काच्या जागा उपलब्ध करून द्याव्यात. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीमुळे एस.इ.बी.सी कोट्यात परीक्षेचे अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे, तो अन्याय त्वरित दूर करावा. इतर शासकीय पदांची रखडलेली भरती आणि रखडलेले शैक्षणिक प्रवेश याबाबत राज्य सरकारने गंभीरपणे प्रयत्न करून सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची स्थगिती हटवावी किंवा अध्यादेश काढून लवकरात लवकर ही समस्या सोडवावी.
राज्य सरकारने मराठा समाजाला तात्पुरत्या स्वरूपात दिलेल्या इएसडब्ल्यू सवलतीपेक्षा मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे मराठा आरक्षण मिळवण्याकरता केंद्र सरकारच्या काही मंत्र्यांना पत्रव्यवहार करावा. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती रद्द होईपर्यंत, मराठा समाजातील विद्यार्थी आणि युवकांसाठी अनेक निर्णय सध्याच्या सरकारने घेतले आहेत. उदा. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) निधी पुरवठा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेला लाभ एसइबीसी प्रवर्गातील उमेदवारांना देणे, डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास निधी देणे, मराठा समाजातील तरूणावरील गुन्हे मागे घेणे, मराठा क्रांती मोर्चामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरीत घेणे या निर्णयाची ताबडतोब व प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन देताना राजाराम चव्हाण, संजय चव्हाण, सुधीर पवार, बाळा धनवडे, उमेश पोपळे, अंकुश हुबाळ, विष्णु चांदर, जाधवसर, मोहन देशमुख, गणपती चोरगे, श्रीशेष जाधव, धनराज चव्हाण यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |