उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन दिवसाची सुरुवात करणारी आपली भारतीय संस्कृती. गेलेल्या दिवसांन मला काय दिलं आणि त्या दिवसा कडून मी सकारात्मक काय घेतलं याचा विचार करत करत रात्र संपते आणि उगवतो तो दुसर्या दिवशीचा सूर्य.
आयुष्यातील प्रत्येक संध्याकाळी,
नकारात्मकतेचा सूर्य मावळावा,
प्रेरणा, जिद्द अन् चिकाटी घेऊन,
दिवस रोजचा उगवावा.
आयुष्यातील प्रत्येक सकाळ ही अशीच छान हसत आणि नवीन ऊर्जा देणारी उगवावी आणि उगवली पाहिजे. गेलेल्या दिवसाने भलेही त्रास, वेदना, मनस्ताप दिला असेल पण तो त्रास, वेदना, क्लेश सकारात्मकतेने पिऊन त्याची संजीवनी बनवावी अन् नव्या दिवसाला नित नव्याने सामोरं जावं. बरेचदा असं होत की, माणूस अडकून पडतो स्वतः च्याच वेदनांत, दुःखात आणि विवंचनेत, सतत संकटांचा पाढा वाचत बसतो आणि मग हरवून बसतो सुंदर मुक्तपणे जगण्याचं समाधान. अडचणी कुणाला नसतात. मानवी देह आहे म्हणजे अडचणी या असणारच. पण त्यावरसुद्धा सकारात्मकतेने मात करतो तो माणूस. या अडचणींची शिडी बनवून यशाची शिखरं अशी लिलया पार करता यायला हवीत. हे ज्याला आणि जेव्हा जमेल तेव्हाच खर्या अर्थाने प्रत्येक दिवस हा नवी ऊर्जा देणारा असेल.
2020 सरलं. आज 2021 मधील पहिला दिवस.2020 मधील पूर्ण बारा महिने संपले. आपण ते जगलो. पण यातील आपण काय आठवतो तर एकच.. कोरोना.. लॉकडाऊन... आकडे किती वाढले आणि किती गेले. या लॉकडाऊन प्रमाणे मनाचे दरवाजे आपण बंद केले. विचारांचे दरवाजे बंद केले. बर्याच जणांच्या तोंडून ऐकल 2020 ना अजिबात चांगलं गेलं नाही. इतकं नुकसान झालं, इतकी माणसं गेली, घरात बसून नुसता वैतागून गेला जीव. या अशा कमेंट ऐकल्या की वाटतं खरच 2020 इतकं वाईट गेलं? 2020 ची एकच बाजू आपण बघितली ज्यामधे आपण फक्त कोरोना रुग्णांचे आकडे, आपल झालेलं नुकसान आणि लोक डाऊन या वर्तुळातच फिरत होतो.
पण मित्रांनो 2020 ची दुसरी बाजू काय दाखवते. हे तेच 2020 साल आहे ज्यान आपल्याला घरातल्या माणसांशी संवाद करायला शिकवलं. पैशाच्या मागं धावणार्या आपल्याला स्वतः साठी जगायला शिकवल. कुटुंब, नाती, आपल गाव, गावची माती यांच्याशी नव्यानं भेट घडवून दिली ती याच 2020 ने. गाडीची चाकं कशी पळतात भरधाव त्याप्रमाणे भौतिक सुखाच्या मागे पळणार्या आपल्याला जीव वाचवण आणि जगणं किती महत्वाचं आहे ते पटवून कोणी दिलं तर याच 2020 ने. हॉटेलमध्ये हजारो रुपये चुटकीसरशी उडवणार्या आपल्या हातांना लगाम घातला तो याच वर्षी. याच वर्षाने माणसातलं प्रेम फुलवल. माणसातला संवाद जागा केला. तीन तीन पिढ्या एकत्र बसून खेळल्या, जेवल्या, गप्पागोष्टी करू लागल्या त्या याच 2020 मधे.
सूनसान वाटणारी गावाकडची माती पुन्हा हसू लागली ती याच 2020 मधे. ज्या आवडी-निवडी, छंद आपण या भौतिक सुखाच्या माग धावताना विसरून गेलो होतो ते सुख, ते छंद, त्या आवडी निवडी पुन्हा जोपासता आल्या त्या याच 2020 मधे. या वर्षाने नवीन नाती, नवीन माणस मिळवून दिली. नवे बंध, नवा ताल, लय, सूर, संगीत आणि नवीन नात्यांमधील्या नवीन गंधान पुलकित झालेलं हे 2020 संपल. हो संपल. पण जाताना नवा सुगंध देऊन गेलं. आपल्याला आपलं बालपण परत देऊन गेलं. नव्याने लढण्याचं बळ देऊन गेलं. आणखी काय हवं आहे 2021 ला सामोरं जाताना? 2020 मधील ही सगळी सकारात्मक ऊर्जा त्या नकारात्मक ऊर्जेला पुरून उरणारी आहे. म्हणूनच भेदून टाका ते निराशेचे. नकारात्मकचे कवच आणि 2021 मधील सुंदर दिवसाचं तितक्याच सुंदरतेचे स्वागत करा.
अंड जेव्हा आतून फुटतं तेव्हा एक नवीन जीव जन्माला येतो तसचं तुमच्या नकारात्मकतेला आतून पळवून लावा आणि सळसळणारी सकारात्मकतेची ऊर्जा घेऊन या उगवतीचं तितक्याच आनंदाने स्वागत करा. असं गृहीत धरा की येणार 2021 हे राग, लोभ, चिंता, प्रेम, क्लेश यांनी भरलेलं असणारच आहे. वेदना नाही, दुःख नाही ते आयुष्य कसलं. जीवनात चॅलेंज, आव्हान ही हवीतच. म्हणून येणार्या 2021 मध्ये प्रसंग कसाही असला तरी खंबीरपणे त्या प्रसंगाला तोंड देण्याचं वचन तुम्हीच तुम्हाला दया. मैं हुं ना! डरने का नही! येऊ देत कितीही वादळं मी अशी चुटकी सरशी हवेत उडवून लावीन अशी शपथ तुम्हीच तुम्हाला दया. या नवीन वर्षात छान हसत राहा. आनंदात राहा. स्वतः ला समृध्द करा. गेलेल्या वर्षान जी नाती जोडून दिली ती आयुष्यभर सांभाळण्याचा जीवापाड प्रयत्न करा.
2021 मधील प्रत्येक सकाळ तुमच्या हसण्यानं अन् सकारात्मक विचारांनी सुरू होऊ द्या अन् प्रत्येक रात्र नकारात्मकतेचं गाठोड दूर कुठेतरी बांधून ठेऊन मावळू दया. तुम्ही खुश राहा. इतरांना खुश करा. मग बघा या वर्षात कितीही खडतर प्रसंग आले तरी तुम्ही स्वतःच म्हणाल,
नित नव्या उमेदीने सज्ज राहा
हसत हसत लढण्यासाठी सदा.
आयुष्य सुद्धा तुझ्यावर,
होईल बघ फिदा.
या उगवतीचं स्वागत इतक्या प्रेमाने करा की, वर्षातील प्रत्येक दिवसाने तुमच्याच प्रेमात पडावं. तुमच्या कडून या उगवतीचं स्वागत असच सकारात्मकतेने व्हावं.
लेखन: सौ.आराधना गुरव, वडूज (सातारा)
शब्दांकन: प्रकाश राजेघाटगे
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |