04:21pm | Jan 07, 2021 |
न्यूयॉर्क : पराभव मान्य नसलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अखेर नरमले आहेत. त्यांनी पराभव मान्य केला असून ते 20 जानेवारीला जो बायडेन यांना सत्ता स्वाधिन करणार असल्याचे सूतोवाच मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले असल्याचे वृत्त आहे. अमेरिकेत हिंसेदरम्यान काँग्रेसने प्रेसिडेंट इलेक्ट जो बायडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. यूएस काँग्रेसच्या जॉइंट सेशनमध्ये वाइस प्रेसिडेंट इलेक्ट कमला हॅरिस यांच्याही विजयाला मंजुरी देण्यात आली. काँग्रेसच्या मंजुरीनंतर बायडेन अधिकृतरित्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्ष झाले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक स्वभावामुळे अमेरिकेत राष्ट्रपती निवडणुकीनंतर ज्याची भीती होती तेच घडले. बुधवारी जो बिडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी संसदेचे दोन्ही सभागृह एकत्र आले. मतमोजणी दरम्यान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे शेकडो समर्थक संसद भवन (कॅपिटल हिल) मध्ये घुसले. यावेळी गोळीबार देखील झाला आणि एका महिलेचा मृत्यू झाला, तर हिंसाचारात आतापर्यंत चार जणांचा जीव गेला आहे.
यूएस कॅपिटल हिस्टोरिकल सोसायटीचे डायरेक्टर सॅम्युअल हॉलिडेने सीएनएनला सांगितले की, 24 ऑगस्ट 1814 मध्ये ब्रिटनने अमेरिकेवर हल्ला चढवला होता. अमेरिकन सैन्याच्या पराभवानंतर ब्रिटिश सैनिकांनी यूएस कॅपिटलमध्ये आग लावली होती. तेव्हापासून आतापर्यंत मागील 206 वर्षात अमेरिकन संसदेवर असा हल्ला झाला नाही.
न्यूयॉर्क टाइम्सने एक फोटो द्वारे सांगितले की, जेव्हा ट्रम्प समर्थक संसदेत गोंधळ घालत होते, तेव्हा काही पोलिस अधिकार्यांना दंगलखोरांवर बंदूक धरली. यात एका महिलेचा मृत्यू झाला. मात्र या महिलेचा मृत्यू पोलिसांच्या गोळीने झाला की, दुसरीकडून कोणी गोळी झाडली हे अद्याप समजले नाही.
परंतु दुसर्या बाजूला कॅपिटल हिलमध्ये हिंसेनंतर ट्रम्प यांनी ट्विटरवर 1 मिनिटाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये ते आपल्या समर्थकांना म्हणत होते - मला माहिती आहे तुम्ही दुःखी आहात. आपल्याकडून निवडणूक हिसकावून घेण्यात आली. यावेळी निवडणुकीत धोका झाला. मात्र आपण त्या लोकांच्या हातात खेळू शकत नाही. आपल्याला शांतता ठेवायची आहे. तुम्ही घरी परता.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |