11:30am | Jan 24, 2023 |
सातारा : गेल्या चोवीस तासात सातारा शहरात दोन दहशतीच्या घटना घडल्याने शांतता प्रिय पेन्शनर सिटी हादरली आहे. कोयता गँगच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यानंतर काही तासातच वाढे फाटा परिसरातील एका हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री एक वाजता गोळीबार झाला. शुक्रवार पेठ येथील अमित भोसले हा युवक या हल्ल्यात ठार झाला यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या घटनांची गंभीर दखल घेतली असून तपास यंत्रणा अॅक्शनं मोडवर आली आहे.
सातारा शहरानजीक असलेल्या महामार्गावरील वाढे गावच्या हद्दीत एका हॉटेल परिसरात गोळीबार करत एकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या झालेल्या युवकाचे नाव अमित भोसले असल्याची माहिती असून युवकाच्या डोक्यात गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. गोळीबारानंतर मारेकरी फरार झाले आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा शहरातील महामार्गावर मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. गोळीबार झाल्याच्या थरारनंतर परिसरात खळबळ उडाली. वाढे फाट्यानजीक पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या व येणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर हॉटेल व्यावसाय चालतो. याच परिसरात हा गोळीबार झाला आहे. गोळीबाराचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या गोळीबारामुळे हॉटेल व्यावसायिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण आहे. सदरचा मृत्यू झालेला युवक सातारा शहरातील असून, त्याच्यावर सातारा जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत आहे. त्या ठिकाणी त्याच्या कुटुंबियांनी, मित्रांनी धाव घेतली आहे. सातारा पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
तडवळे सं. वाघोली येथील स्टोन क्रशर बंद करा |
मोबाईलची चोरी |
सुमारे साडेसात लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
गाडीच्या बॅटऱ्यांची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
धक्काबुक्की केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल |
दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून बॅटर्यांची चोरी |
शॉक लागून एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
8 कोटी 3 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी 19 जणांवर गुन्हा |