09:13pm | Nov 26, 2020 |
सातारा : सातारा जिल्ह्यात 13 वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असणार्या अवैध दारु अड्ड्यांवर छापे टाकून सुमारे 63 हजार रुपयांची दारु हस्तगत करण्यात आली. गेल्या काही दिवसांत पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई ठरली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कृष्णानगर कॅनॉल ते सातारा शहराकडे जाणार्या रस्त्यावर भारत गंगाराम कांबळे (वय 45, रा. प्रतापसिंहनगर, ता. सातारा) हा चालवित असलेल्या दारु अड्ड्यावर छापा टाकून त्याच्याकडून 21 हजार 248 रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या व एक दुचाकी जप्त करण्यात आली. दुसर्या घटनेत खंडाळा, ता. खंडाळा गावच्या हद्दीत अहिल्यादेवी चौक परिसरात आकाश अभिनव वाघमारे (रा. खंडाळा, ता. खंडाळा) याच्याकडून 780 रुपये किंमतीच्या दारुच्या 15 बाटल्या जप्त केल्या. तिसर्या घटनेत शिवाजीनगर, ता. खंडाळा गावच्या हद्दीत भोसलेवस्ती येथे घराच्या भिंतीच्या आडोशाला छाया बाळू चव्हाण (वय 50, रा. भोसलेवस्ती, शिवाजीनगर, ता. खंडाळा) हिच्याकडून 780 रुपये किंमतीच्या देशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. चौथ्या घटनेत पुसेगाव, ता. खटाव तालुक्याच्या हद्दीत दहिवडी रस्त्यावर सम्राट ढाब्याच्या आडोशाला राहुल शहाजी गायकवाड (वय 25, रा. पुसेगाव, ता. खटाव) याच्याकडून 936 रुपये किंमतीच्या देशी दारुच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. पाचव्या घटनेत पाडेगांव, ता. खंडाळा गावच्या हद्दीत जय माता दी हॉटेलच्या पाठिमागे राजेश पंजाब नवले (रा. पाडेगांव, ता. खंडाळा) याच्याकडून 624 रुपये किंमतीची देशी दारु हस्तगत केली. सहाव्या घटनेत कापडगांव, ता. फलटण गावच्या हद्दीत घराच्या आडोशाला तेथीलच अनिता बाळू गंगावणे या महिलेकडून 572 रुपये किंमतीची देशी दारु हस्तगत करण्यात आली. सातव्या घटनेत वडगाव पोतनीस, ता. खंडाळा गावच्या हद्दीत तेथीलच संदीप मदन कुंभार (वय 32) याच्याकडून 3500 रुपये किंमतीची हातभट्टीची दारु जप्त केली. आठव्या घटनेत शिरवळ, ता. खंडाळा गावच्या हद्दीत लोणंदकडे जाणार्या मार्गावर विशाल उर्फ बाबू महादेव चव्हाण (वय 27, रा. भोळी, ता. खंडाळा) याच्याकडून 29 हजार 992 रुपये किंमतीच्या देशी दारुच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. नवव्या घटनेत तडवळे, ता. खटाव गावच्या हद्दीत तेथीलच सुरेखा सुर्यकांत पवार या महिलेकडून 624 रुपये किंमतीची देशी दारु जप्त करण्यात आली. दहाव्या घटनेत ओझर्डे, ता. वाई गावच्या हद्दीत एसटी स्टँड जवळ राहत्या घराच्या भिंतीच्या आडोशाला तेथीलच राजेंद्र शंकर जाधव (वय 59) याच्याकडून 988 रुपये किंमतीची दारु जप्त करण्यात आली. अकराव्या घटनेत गोळेश्वर, ता. कराड गावच्या हद्दीत स्मशानभूमीजवळ सत्यवान आनंदा आडके (रा. गोळेश्वर, ता. कराड) याच्याकडून 1248 रुपये किंमतीची देशी दारु हस्तगत करण्यात आली. बाराव्या घटनेत वेणेगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत हजरफ हनीफ सुतार (रा. सासपडे, ता. सातारा) याच्याकडून 780 रुपये किंमतीची दारु हस्तगत करण्यात आली. तेराव्या घटनेत विडणी, ता. फलटण गावच्या हद्दीत तेथीलच सुशील सुरेश जगताप याच्याकडून 780 रुपये किंमतीची देशी दारु जप्त करण्यात आली.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |