08:37pm | Apr 19, 2021 |
नवी दिल्ली : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व पात्र व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे.
याआधी 60 वर्षांवरील ज्येष्ठांना लस दिली जात होती. त्यानंतर 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आता 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोव्हिड 19 लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी केंद्र सरकारनं 1 मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
करोनाने देशातील स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. यानंतर पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. जास्तीत जास्त नागरिकांना कमीत कमी वेळेत करोनावरील लस उपलब्ध करून देण्यासाठी सरकार गेल्या वर्षाभरापासून प्रयत्न करत आहे, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.
लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यानुसार लसी उत्पादक लसीचा ५० टक्के लसींचे डोस हे केंद्र सरकारला पुरवतील. आणि उर्वरीत ५० टक्के डोस हे राज्य सरकार किंवा खुल्या बाजारात विकण्यास स्वतंत्र असतील, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. करोनावरील लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात लसीच्या किंमती, पुरवठा, पात्रता आणि लसीकरण प्रक्रिया अधिक लवचिक करण्यात आली आहे. लसीकरणात सहभागी असलेल्या पातळ्यांवरील भागिदारांबाबत लवचिक धोरण अवलंबण्यात आलं आहे.
राज्य सरकारांना आता थेट लस उत्पादकांकडून लसीचे डोस विकत घेता येतील. तसंच १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना राज्य सरकारं आता लस देऊ शकतील. केंद्र सरकारची करोनावरील आधीची मोहीमही सुरूच राहणार आहे. प्राधान्याने ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरूच राहणार आहे, अशी माहिती केंद्राने दिली आहे.
लस उत्पादकांना आता आपलं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढवावं लागणार आहे. एवढचं नव्हे तर लसीच्या उत्पादनासाठी देश आणि विदेशातील उत्पादकांची मदतही घेता येईल. रशियाची लस स्पुतनिक-व्हीचे उत्पादनही आता देशात होणार आहे. खासगी लस उत्पादकांनी आपल्या लसींच्या डोसेसची किंमत १ मे पूर्वी जाहीर करून पादर्शकता ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच खासगी हॉस्पिटल्सही बाजारातून पुरवठादारांकडून लस विकत घेऊ शकणार आहे.
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |