02:08pm | Aug 13, 2022 |
वाई : देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिले. बाबासाहेब आंबेडकर आणि घटनासमितीने जगात उत्तम देशाची घटना तयार केली. गेल्या ७५ वर्षात देशाचा चौफेर विकास झाला. लोकशाही आणि हुकूमशाही यामध्ये एक पातळ रेष असते. देशाच्या लोकशाहीचे संरक्षण करणे आपले कर्तव्य असून, स्वातंत्र्य वीराचे सदैव स्मरण ठेवले पाहिजे. देशाचे स्वातंत्र्य आबाधित ठेवणे वर्तमानातील आव्हान आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या आझादी गौरव यात्रा, व तिरंगा रॅलीत बोलताना केले.
यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, वाई खंडाळा महाबळेश्वरचे युवा नेते विराज शिंदे, प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस जयदीप शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष महिला जिल्हाध्यक्ष अल्पनाताई यादव, सेवा दलचे जिल्हाध्यक्ष प्रतापराव देशमुख, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई , तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रवींद्र भिलारे, विलास पिसाळ, जिल्हा चिटणीस अतुल सपकाळ, तारिक बागवान, तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रदीप जायगुडे, सुनील बाबर, तालुका उपाध्यक्ष कल्याण पिसाळ, सरचिटणीस राजेंद्र पाडळे, प्रशांत शिंगटे, साचीन काटे, गणेश शिंदे,मंजिरी पानसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली असून, स्वातंत्र्य लढ्यात अनेकांचे महत्वाचे योगदान आहे, सध्या देशाची अवस्था हुकुमशाहीकडे झुकत असून हुकुमशाहीला बळी पडलेल्या श्रीलंका, पाकिस्तान, इंग्लंड, या देशामध्ये मोठ्या प्रमाणात उठाव झाला, भारत देशाची वाटचाल त्याचा दिशेने दुर्दैवाने चालू आहे, घटना रद्दबादल ठरविण्याचा घाट घालण्यात येत आहे, आतंकवाद फोफावला आहे, रशिया आणि युक्रेन यांच्या युध्दामुळे आर्थिक व्यवस्था अडचणीत आलेली आहे. अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होताना देशाची लोकशाही अडचणीत येवू नये यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही चव्हाण यांनी आर्वजून सांगितले.
आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे कवठे येथे दुपारी चार वाजता आगमन झाले. स्वातंत्र्यसैनिक कै. किसन वीर तथा आबासाहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून चव्हाण वाई मध्ये आले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सोनगीरवाडी, वाई न्यायालया शेजारी असणाऱ्या हुतात्मा स्मारकात शहिदांना अभिवादन करून पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पोस्ट ऑफिस मार्गे किसनवीर चौक येथून चित्रा टॉकीज मार्गे गोविंद रामेश्वर मंगल कार्यालयावरून नगरपालिका कार्यालय येथून शहीद स्मारक भाजी मंडई येथे समारोप करण्यात आला, ही पदयात्रा भर पावसात निघाली त्यानंतर टिळक ग्रंथालयाच्या रमेश गरवारे हॉलमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला. प्रास्ताविक प्रदीप जायगुडे यांनी केले तर आभार जयदीप शिंदे यांनी मानले, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी वाई काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी युवक काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |