08:46pm | Jan 12, 2022 |
सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालय सातारा परिसरात मानवी कवटी आढळली असल्याचे वृत्त काही मीडियावर प्रसारित होत आहे. हे वृत्त पूर्णपणे चुकीचे, निराधार व दिशाभूल करणारे असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
याबाबत डॉ. चव्हाण यांनी सांगितले, बुधवार दि.12 जानेवारी 2022 रोजी काही चलचित्र वाहिनी मधील रिपोर्टर माझे कार्यालयामध्ये येऊन जिल्हा शासकीय रुग्णालय सातारा परिसरात मानवी कवटी आढळली आहे, असे सांगून त्यांच्या मोबाईलवर त्यांनी मला मानवी कवटीची चित्रफीत दाखवली.
मी व माझे सहकारी डॉ. सुभाष कदम, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक तसेच डॉ. राहुलदेव खाडे फोरेन्सिक एक्सर्प्ट या बाबीची प्रत्यक्ष शहानिशा करण्यासाठी संबंधित पत्रकारासोबत पाहणीसाठी गेलो असता त्यांनी आम्हाला सिव्हिल हॉस्पिटल परिसराबाहेर इंगवले यांचे मटण दुकानाच्या मागील बाजूस नाल्यालगत मानवी कवटी आहे, असे सांगितले. परंतु प्रत्यक्षात पाहणी केली असता कोणतीही मानवी कवटी आढळून आली नाही.
सदरची मानवी कवटी ही सिव्हिल हॉस्पिटल सातारा च्या आवारात सापडली, असे वृत्त हे पूर्णपणे चुकीचे, निराधार व दिशाभूल करणारे आहे. तसेच या घटनेशी सिव्हिल हॉस्पिटल सातारा प्रशासनाचा काहीही संबंध नाही.
या गोष्टीचा तपास पोलीस यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दूरध्वनीद्वारे कळविण्यात आले आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |