08:38pm | Jun 21, 2022 |
सातारा : शिवसेनेचे नगर विकास मंत्री व सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे 17 आमदारांसह नॉटरिचेबल झाल्याने मुंबईमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. या भूकंपामध्ये गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, कोरेगावचे आमदार महेश शिंदे हे दोघे आऊट ऑफ कव्हरेज गेल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.
सातारा शहरातील शिवसेना कार्यालयांमध्ये प्रचंड सन्नाटा असून जिल्हा कार्यकारिणीच्या बऱ्याच नेत्यांनी याविषयी मौन बाळगले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीतही भाजपने महाविकास आघाडीला चांगलाच धोबीपछाड दिला आहे. या अपयशाची तीव्र नाराजी व्यक्त करत नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे 17 आमदारांसह सुरत येथे पोचल्याने मुंबईतील राजकीय वर्तुळामध्ये मोठा भूकंप झाला आहे. भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीतही पाच जागा निवडून आणत शिवसेना आणि काँग्रेसची मते फोडण्यात कमालीचे यश मिळवले. शिंदे यांनी दिलेल्या उमेदवारांची नावे यादीतून डावलण्यात आल्याने हे नाराजी नाट्य प्रकर्षाने समोर आले आहे.
सतरा आमदारांसह शिंदे गुजरातकडे रवाना झाल्याने ठाकरे सरकार अल्पमतात येऊन पडणार असल्याची चर्चा जिल्ह्याच्या वर्तुळात सुरू झाली आहे. शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांमध्ये सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे आणि गृहराज्यमंत्री व शंभूराज देसाई यांचा समावेश आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राजकीय समीकरणांची पडताळणी करून भाजप मधून शिवसेनेत गेलेले महेश शिंदे हे म्हणायला जरी शिवसेनेत असले तरी ते भाजपच्या गोतावळ्यात रमलेले असतात. महेश शिंदे यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव केला होता. शिंदे सेनेचे आमदार असले तरी त्यांची भाजपची सलगी ही कोणापासूनही लपून राहिलेली नाही. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि महेश शिंदे यांच्यातील राजकीय सलगी वेळोवेळी दिसून आली आहे. कोरेगाव नगरपंचायतीच्या विविध कामांसाठी नगरोत्थान तसेच वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून एकनाथ शिंदे यांनी सढळ हस्ताने त्यांना निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे त्यांच्यातील राजकीय लागेबांधे चांगलेच दृढ झाले आहेत. कामाचा झपाटा आणि अनुभव असूनही शिवसेनेच्या कोट्यातून शिंदे यांना मोठ्या प्रमाणावर संधी मिळाली नाही. त्यामुळेच ते एकनाथ शिंदे यांच्या समूहात सामील झाल्याची राजकीय चर्चा आहे.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे पाटण चे आमदार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि मर्जीतले नेते म्हणून शंभूराज देसाई यांची विशेष ओळख आहे. त्यामुळे त्यांची गृहराज्यमंत्री पदी वर्णी लागली होती. मात्र ते सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या बंडात सामील झाल्याची चर्चा सुरू झाल्याने पाटण तालुक्यातही देसाई समर्थक अस्वस्थ आहेत.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी इतके जवळचे संबंध असताना गृहराज्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ का द्यावी, या त्यांच्या भूमिकेबद्दल विलक्षण आश्चर्य व्यक्त होत आहे. सातारा शहरातील शिवसेना कार्यालय तसेच कार्यकारिणीच्या काही सदस्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता बरेच सदस्य तातडीने मुंबईला रवाना झाल्याची चर्चा आहे. संपर्कमंत्री नितीन बानगुडे पाटील हे सुद्धा मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे वृत्त असून शिवसेनेचे सातारा शहर कार्यालय दिवसभर बंद होते.
कंपनी सचिवांच्या सल्ला, मार्गदर्शनाशिवाय कंपन्या काम करु शकणार नाहीत |
राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत भरतनाना पाटील यांना संधी द्यावी |
'आम्हाला डुक्कर म्हणता, अहो याच डुकरांची मतं घेऊन खासदार झालात' |
साताऱ्यात १७ जुलै रोजी मोफत 'जयपूर फूट' शिबीर |
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा |
फिरते लोकन्यायालय मोबाईल व्हॅनचा प्रमुख शुभारंभ |
श्री शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालयात 8 जुलै रोजी मोफत कोरोना लसीकरण |
श्री सेवागिरी महाराजांच्या पायी पालखी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान |
अजय चौधरी यांच्या गटनेतेपदाची निवड रद्द करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना नाही |
भास्कर जाधव यांच्या आक्रमक टीकेनंतर सभागृहात चांगलाच गोंधळ |
चिमूटभर गुणरत्न सदावर्ते टाकायचे आणि संजय राऊत तयार |
शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही फुटीची चिन्हे ? |
काही लोक पक्ष सोडून गेले म्हणून शिवसेना संपली नाही |
नटराज मंदिर परिसरातील खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात |
बहुमत चाचणीवेळी शिंदे-फडणवीस सरकारला काँग्रेस-राष्ट्रवादीची 'अदृश्य'मदत |
फिरते लोकन्यायालय मोबाईल व्हॅनचा प्रमुख शुभारंभ |
श्री शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालयात 8 जुलै रोजी मोफत कोरोना लसीकरण |
श्री सेवागिरी महाराजांच्या पायी पालखी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान |
अजय चौधरी यांच्या गटनेतेपदाची निवड रद्द करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना नाही |
भास्कर जाधव यांच्या आक्रमक टीकेनंतर सभागृहात चांगलाच गोंधळ |
चिमूटभर गुणरत्न सदावर्ते टाकायचे आणि संजय राऊत तयार |
शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही फुटीची चिन्हे ? |
काही लोक पक्ष सोडून गेले म्हणून शिवसेना संपली नाही |
नटराज मंदिर परिसरातील खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात |
बहुमत चाचणीवेळी शिंदे-फडणवीस सरकारला काँग्रेस-राष्ट्रवादीची 'अदृश्य'मदत |
एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारचा विजयी झेंडा |
कोयनेच्या त्यागातून लाभला महाराष्ट्राला मुख्यमंत्री |
केदारेश्वर महाराज कोरेगाव दिंडीचे वर्धनगड येथे उस्फूर्त स्वागत |
विठुरायाच्या महापूजेनंतर दुसऱ्या दिवशी सरकार राहणार नाही |
शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त |