05:22pm | Apr 01, 2022 |
फलटण : फलटण तालुक्यातील जवळपास सर्वच विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमध्ये मयत असलेल्या सभासदांची नावे प्रदीर्घ कालापासून अद्याप तशीच असून त्यांची नावे मतदार यादीतून का हटवली गेली नाहीत, असा सवाल करत सर्व विकास सोसायट्यांमधील मयत सभासदांच्या वारसांना वारसा हक्काने सभासद करुन घेवून या यादीतील घोळ दुरुस्त करावा, अशी मागणी शिवसेनेचे फलटण तालुका प्रमुख प्रदीप झणझणे यांनी केली आहे.
याबाबत फलटण तालुक्याचे सहाय्यक निबंधकांना निवेदन दिले असून निवेदनात झणझणे यांनी म्हटले आहे की, फलटण तालुक्यात नुकत्याच झालेल्या सोसायट्यांच्या निवडणुकांमध्ये एक दोष मोठ्या प्रमाणावर समोर आला आहे. झणझणे सासवड येथील सोसायटीच्या निवडणूक मतदार यादीत पाचशेच्या आसपास मयत सभासदांची नावे आहेत. प्रदीर्घ कालापासून हे सभासद मयत असताना त्यांची नावे अद्याप का हटवली गेली नाहीत व त्या ठिकाणी त्यांच्या वारसांची नावे का लावली गेली नाहीत, याची चौकशी करावी.
फलटण तालुक्यांमध्ये सोसायट्यांमध्ये अशा प्रकारे घोळ असून त्यामुळे मयत सभासदांच्या वारसांना सोसायट्यांच्या विविध योजनांचा लाभ मिळालेला नाही. मयत सभासदांचे शेअर्स वाटले गेलेले नाहीत. जर वाटले असतील ते कोणी घेतले असे अनेक प्रश्न यामुळे निर्माण होत आहेत. तसेच जो जामीनदार आहे त्याला सोसायटीचा सभासद होण्याचा अधिकार आहे. जर सत्ताधारी संचालक मंडळ तोंडे पाहून सोसायटीचे सभासद निवडण्याचा व त्यांना कर्ज वाटप करण्याचा प्रकारही तालुक्यात घडत आहे.
सहाय्यक निबंधकांनी अशा घोळ असलेल्या सर्व सोसायट्यांमधील मतदार याद्यांचा सर्व्हे करुन अनेक वर्षांपासून मयत सभासद यादीत असतील तर त्यांच्या वारसांना तिथे सभासद करुन घ्यावे व त्यांना सोसायट्यांच्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा आणि जमीनधारकांना, वारसांना, सभासदांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी, अशी मागणी झणझणे यांनी केली निवेदनात केली आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |