01:08pm | Jul 04, 2020 |
सातारा : सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असताना उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. सातारा येथील बोगद्याच्या बाहेर घाटात चिकन विक्रेत्यांनी टाकलेली कोंबड्यांची पिसे आणि इतर अवशेष रोगराईला निमंत्रण देत आहेत. या घाणीमुळे सातारकरांची आरोग्य धोक्यात आले असून घाण टाकणारांवर कारवाई करण्याबाबत प्रशासन कानाडोळा करत असल्याचा आरोप होत आहे.
ऐतिहासिक सातारा शहराला सध्या कोरोना महामारीने ग्रासले आहे. एकीकडे कोरोनाशी झुंज सुरु असतानाच काही बेजबाबदार लोकांकडून उघड्यावर कचरा, घाण टाकून रोगराईला निमंत्रण देण्याचे प्रकार सुरु आहेत. सातारा शहराच्या दक्षिणेला समर्थ मंदिरच्या पुढे ऐतिहासिक बोगदा आहे. या बोगद्यातून शेंद्रे आणि सज्जनगड असे दोन रस्ते जातात. शेंद्रे रस्त्याला सातारा नगर पालिकेचा अधिकृत सोनगाव कचरा डेपो आहे. याठिकाणी संपूर्ण सातारा शहरातील कचरा टाकला जातो. मात्र याच्याच विरुद्ध बाजूला बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर सज्जनगड जाणाऱ्या रस्त्यावर पहिल्याच वळणाच्या दरीत मृत कोंबड्यांचे अवशेष, पिसे, इतर कचरा, बाटल्या टाकण्यात आल्या आहेत. दररोज याठिकाणी हि घाण टाकली जात असून आता पिसांचा मनोरा उभा होत आहे.
हि घाण समर्थ मंदिर व आसपासच्या चिकन विक्रेत्यांकडून टाकली जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या घाणीमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. प्रशासनाने या घाणीची त्वरित विल्हेवाट लावावी आणि यापुढे याठिकाणी घाण पडू नये यासाठी संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी आणि सातारकर नागरिक करत आहेत.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |

भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |