10:57pm | Oct 15, 2020 |
सातारा : विकासनगर, सातारा येथील रहिवासी असलेल्या सोमनाथ खुडे यांना शासनाच्या नावावर असलेली जमीन विक्री करुन त्याची 12 लाखाची फसवणूक करणाऱया तसेच त्यांचे बाँबे रेस्टारंट येथील दुकान पेटवून देणाऱयांवर ऍट्रॉसिटी तसेच फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा. खुडे यांची तक्रारच घेण्यास टाळाटाळ केली जात असून याबाबत न्याय न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उमेश चव्हाण यांनी दिला आहे.
याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांना निवेदन दिले. यावेळी त्यांनी याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की श्रीरंग बंडू बोराटे, अशोक बजरंग बोराटे, रोहित अशोक बोराटे, शुभम अशोक बोराटे, मनोज बोराटे, बजरंग बंडू बोराटे, मनोज बोराटे, बापू बोराटे सर्व रा. चाहूर, खेड, सातारा यांनी सोमनाथ बळीराम खुडे रा. विकासनगर, सातारा यांना कार्यकारी अभियंता यांच्या नावावर असलेली जमीन विक्री केलीय.
हा जमिनीचा व्यवहार केवळ 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटराईज करुन सोमनाथ खुडे यांच्याकडून 10 ते 12 लाख रुपये घेतलेले आहेत. ही फसवणूक लक्षात आल्यावर खुडे यांनी पैसे परत मागितले असता बोराटे कुटुंबियांनी वाद सुरु केला. या वादातूनच दि. 14 ऑक्टोबर रोजी खुडे यांचे बाँबे रेस्टारंट चौकातील भंगारचे दुकान पेटवून दिले. दुकानाची नासधूस करत गल्ल्यातील 18 हजार रुपये घेवून पळून गेले. याबाबत सोमनाथ खुडे सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेले असता केवळ अदखल पात्र गुन्हा नोंद केला आहे.
वास्तविक जमीन विक्रीत फसवणूक, दुकान पेटवणे हा गंभीर प्रकार असून याबाबत खुडे यांची ज्यांच्याविरुध्द तक्रार आहे. त्यांच्यावर ऍट्रॉसिटीसह फसवणुकीचा गुन्हा दाखल करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी सोमनाथ खुडे, अनिल मोहिते, अजय राठोड, संदीप भिसे तसेच दलित महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |