08:54pm | May 17, 2020 |
पुसेगाव : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोविड - १९ विरूद्ध लढण्यासाठी व देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी विविध देवस्थानांतील सोन्याबद्दल केलेली सुचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांभीर्याने घ्यावी. पृथ्वाराज बाबांनी मांडलेले हे विचार स्तुत्य असून त्यांच्या या विचारांना सातारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचा पुर्ण पाठींबा असल्याचे जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी सांगितले.
माजी पंतप्रधान मा. अटलबिहारी वाजपेयी यांनी सोन्याबद्दल पहिली योजना १९९९ मध्ये गोल्ड डिपॉझिट स्कीम नावाने चालू केली होती. त्यानंतर या योजनेचे नाव बदलून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोल्ड मॉनिटायजेशन या नावाने ही योजना सुरु केली. या स्कीमचा भाग म्हणूनच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा यांनी विविध देवस्थानातील सोन्याबद्दल काही विचार व सुचना मांडल्या होत्या. कोरोनाच्या अभूतपूर्व संकटाला सामोरे जाण्यासाठी देशातील सोन्याचे योग्य नियोजन आणि विनिमय करणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी ही सूचना केली होती. वास्तविक हे सोने कॉंग्रेसपक्षासाठी किंवा कोणा व्यक्तीसाठी नव्हे तर देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागावा यासाठी उपयोगात आणावे असा विचार पृथ्वीराज बाबांनी व्यक्त केला होता. परंतु या चांगल्या सुचनांचा विचार करावयाचे सोडून त्याचा काही लोकांकडून विपर्यास केला गेला आहे. या गोष्टींबद्दल लोकांमध्ये विचाराची देवाणघेवाण चालू होणे गरजेचे असताना आता रूढीवादी व विज्ञानवादी यांच्यातील वादाला तोंड फुटले आहे. या रुढीवादी लोकांनीच महात्मा फुले यांच्यासारख्या अनेक थोर समाजसुधारकांना तसेच माऊली ज्ञानेश्वर यांच्या सारख्या अनेक महान संताना त्रास दिला होता. अशाच रुढीवाद्यांनी देशाच्या सद्यस्थितीत केलेल्या विधानांचा विपर्यास करुन बाबांना काशीच्या मंदिरप्रवेश बंदीचा निर्णय घेतला आहे.देशाची आर्थिक स्थिती व कोरोना १९ मुळे झालेल्या परिस्थितीची पूर्ण जाणीव माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पृथ्वीराज बाबांच्या सुचनांचा गांभीर्याने विचार करावा असे आवाहन डॉ. जाधव यांनी केले आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |