पुसेगाव : खटाव तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या नेर धरणात कमी जलसाठा शिल्लक असल्याने या पाण्यावरती अवलंबून असलेल्या पाणी योजना अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा जलसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवावा, अशी मागणी बुध-ललगुण परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
या वर्षी मुबलक पाऊस पडल्याने दोन वर्षे कोरडे असलेले नेर धरण सप्टेंबर अखेर १०० टक्के भरले होते. धरणात मुभलक पाणीसाठा असल्यास पाणी खटाव तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील गावांना शेतीसाठी सोडण्यात येते. तसेच नेरसह परिसरातील २२ गावांची पिण्याच्या पाण्याची सोय नेर तलावातून केली गेली आहे. पुसेगाव, खटाव, कुरोली सिध्देश्वरसह येरळवाडी पर्यंतच्या शेतकऱ्यांसाठी तलाव महत्वाचा आहे. तलाव तालुक्याच्या 60 टक्के भागाला वरदान ठरलेला आहे. हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यावर या पाण्यावर रब्बी हंगामातील एक हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र ओलिताखाली येते.
मात्र एप्रिल महिन्यात खटाव, भुरकवडी, कुरोली सिध्देश्वर येथील काही शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, कांदा पिकांची काढणी सुरू असताना देखील येरळा नदी व कॅनॉल मध्ये १४ एप्रिल ते २६ एप्रिल दरम्यान पाणी सोडण्यात आले होते. मात्र, या धरणातून सोडलेल्या पाण्याचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना कोणताही उपयोग न होता पाण्याचा अपव्यय झाल्याचे चित्र दिसून आले. गरज नसताना सोडलेल्या पाण्यामुळे व धरण क्षेत्रात एकही उन्हाळी पाऊस न झाल्यामुळे दिवसेनदिवस धरणातील पाणी साठा कमी होत चालला आहे. यामुळे या धारणावरती अवलंबून असलेल्या २२ गावांच्या पाणीपुरवठा योजना अडचणीत येण्याची शक्यता वाढली असून संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन हा जलसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्याची मागणी या २२ गावातील नागरिकांकडून केली जात आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न होण्याची शक्यता परिसरातील शेतकरी बोलून दाखवत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |