01:24pm | Aug 25, 2020 |
बुध: सातारा जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष विराज शिंदे यांच्यातर्फे, स्व.राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सदभावना सप्ताह अंतर्गत वाई तालुक्यातील सर्व रिक्षाचालकांना अन्नधान्याच्या न्याय कीटचे वाटप डॉ. सुरेश जाधव जिल्हाध्यक्ष सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या हस्ते वाई येथील साठे मंगल कार्यालयात करण्यात आले.
यावेळी बोलताना विराज शिंदे म्हणाले की, काँग्रेस हा सर्वसामान्य, गोरगरीब लोकांचा पक्ष आहे. त्याला अनुसरूनचं राहूल गांधी यांनी आपला वाढदिवस कोणीही साजरा न करता त्याऐवजी कोरोना काळात अडचणीत आलेल्या लोकांना मदत करा असे सांगितले होते. त्याचाचं भाग म्हणून आम्ही गेल्या 2 महिन्यांपासून वाई विधानसभा मतदारसंघातील गरजू लोकांना अन्नधान्याच्या न्याय कीटचे वाटप करत आहोत आणि आज येथे रिक्षा चालकांना न्याय कीटचे वाटप करत आहोत. रिक्षाचालकांच्या विमा, बँक हप्ता व इतर अडचणींचे निवेदन त्यांनी जिल्हाध्यक्ष डॉ.जाधव यांना देऊन मंत्रीमहोदय सतेज बंटी पाटील यांच्याकडून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली.
त्यावेळी डॉ.जाधव यांनी रिक्षाचालकांचे प्रश्न लवकरात लवकर मंत्रीमहोदयांसमोर मांडून त्यातून समाधान काढण्याचे आश्वासन रिक्षाचालकांना दिले. तसेच राजीव गांधी यांचे आधुनिक भारत देशाच्या संगणक, तंत्रज्ञान, दूरसंचार क्षेत्रातील विकासातील योगदान किती अमूल्य आहे याबद्दल विवेचन केले. राम मंदीराला खरी चालना राजीव गांधी यांनीचं दिली होती याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली. कोरोना काळात मोदी सरकारने लोकांना वार्यावर सोडून दिले आहे. पण काँग्रेस पक्ष लोकांना मदत करण्याची आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहे. आणि त्याचाचं एक भाग म्हणून आज हे रिक्षाचालकांना केलेले धान्यवाटप आहे.
अडचणीच्या काळात केलेल्या मोलाच्या मदतीबद्दल वाई तालुक्यातील सर्व रिक्षा चालकांनी विराज शिंदे यांचे आभार मानून, आगामी काळात सामाजिक कार्यात त्यांच्या बरोबर राहण्याचे आश्वासन दिले. येणार्या काळात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्व प्रकारचे सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आश्वासन विराज शिंदे यांनी सर्व रिक्षा चालक-मालक संघटनेतील लोकांना यावेळी दिले.
यावेळी सेवादल कमिटी सातारा जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह देशमुख, वाई तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष प्रमोद अनपट, काँग्रेसचे वाई तालुक्यातील जेष्ठ नेते प्रदीप जायगुडे, बावधन गावचे तंटामुक्ती अध्यक्ष विलास पिसाळ, युवा नेते विश्वास जाधव, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच किसनवीर रिक्षा स्टॉप अध्यक्ष प्रकाश ढगे, बस स्थानक स्टॉप अध्यक्ष संदीप घाडगे, मंडई स्टॉप अध्यक्ष मधुकर दुधाने, रविवार पेठ स्टॉप अध्यक्ष राजेंद्र मुंगसे व वाई तालुक्यातील सर्व रिक्षा संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |