08:47pm | Mar 24, 2023 |
सातारा : घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन कपाटातून पावणेदोन लाखाचे दागिने चोरणाऱ्या ओंकार दीपक जाधव वय 19 राहणार सटालेवाडी, तालुका वाई याला वाई पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. याप्रकरणी विद्या दीपक जाधव यांनी वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपीकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मात्र त्याने स्वतःच्याच घरात चोरी का केली असावी, याचा पोलीस शोध घेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, दिनांक 19 मार्च रोजी रात्री 10 ते 21 मार्च सकाळी आठ या दरम्यान सटालेवाडी गावातील विद्या दीपक जाधव यांची सासू बाबर हॉस्पिटल वाई येथे उपचार साठी ऍडमिट होती. त्यामुळे त्यांना घर बंद ठेवावे लागले. असे असताना त्यांच्या घराच्या कपाटातील पावणेदोन लाख रुपयांचे दागिने चोरीस गेले होते. यामध्ये नेकलेस, कर्णफुले, वेढणी अशा मुद्देमालाचा यात समावेश होता. सौ जाधव यांनी वाई पोलीस ठाण्यामध्ये या चोरीची फिर्याद दिली होती.
पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी गुन्ह्याचे गांभीर्य पाहून वाई पोलिसांना तातडीच्या तपासाच्या सूचना दिल्या. वाई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक हे कसून कामाला लागले. शहरात पेट्रोलिंग दरम्यान आणि बातमीदारांच्या गाठीभेटी घेऊन वाई पोलिसांचा तपास सुरू होता. मात्र माहिती मिळत नव्हती. भरणे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरची चोरी घरातील व्यक्तीनेच केली आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने त्या अनुषंगाने तपास केला असता वाई शहरात संशयित आरोपी फिरत असल्याची माहिती मिळाली. पेट्रोलिंग दरम्यान ओंकार जाधव याला एसटी स्टँड समोर पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशात पावणेदोन लाखाचे दागिने आढळून आले. आरोपी हा फिर्यादीचा मुलगा असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत.
या तपासामध्ये गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी विजय शिर्के, सोनाली माने, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, प्रसाद दुष्कर, अमित गोळे यांनी सहभाग घेतला होता. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी संबंधितांचे अभिनंदन केले आहे.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |