10:54pm | May 29, 2020 |
सातारा : जिल्ह्यात आज संध्याकाळी आठजणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून रात्री उशिरा पुन्हा 24 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील आजच्या दिवसातील कोरोना बाधितांची संख्या 32 झाली आहे. तर कारी, ता. सातारा येथील 54 वर्षीय पुरुष व होळ, ता. फलटण येथील वृद्ध महिलेचा कोरोना अहवाल मृत्यू पश्चात पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. आज सकाळी कराड तालुक्यातील नऊजण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
आज संध्याकाळी जिल्ह्यातील आठजणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रात्री उशिराही 24 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात दिवसभरात 32 कोरोना बाधित निष्पन्न झाले असून जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 484 वर पोहोचली आहे, तर कारी, ता. सातारा येथील 54 वर्षीय पुरुष तसेच होळ, ता. फलटण येथील कोरोना अनुमानित वृद्धेचा काल मृत्यू झाला होता. मृत्यू नंतर त्यांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले होते. आज त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 18 वर पोहोचली आहे. आजपर्यंत एकूण 323 कोरोना बाधितांवर उपचार सुरु असून आज कराड येथील कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असलेल्या 9 कोरोना बाधितांना कोरोनातून खडखडीत बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या 143 झाली आहे. आज निष्पन्न झालेल्या कोरोना बाधित लोकांची संख्या खालीलप्रमाणे -
संध्याकाळी मिळालेल्या आठ बाधितांच्या माहितीनुसार - क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणारे चिंचणी ता. खटाव येथील 5 व पळशी ता. खंडाळा येथील 1 तसेच कृष्णा हॉस्पीटल, कराड येथे दाखल असणार्या पाटण तालुक्यातील नवसरवाडी येथील 53 वर्षीय महिला, ताम्हीणे येथील 25 वर्षीय महिला असे एकूण 8 रुग्ण निष्पन्न झाले आहेत.
तसेच आज रात्री उशिरा निष्पन्न झालेल्या 24 बाधितांची गावनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे -
फलटण तालुक्यातील वडले येथील 1, जोरगाव येथील 1, होळ येथील 1 (मृत वृद्ध महिला), साखरवाडी येथील 1.
माण तालुक्यातील म्हसवड येथील 1, दहिवडी येथील 1, राणंद येथील 1.
पाटण तालुक्यातील नवारस्ता येथील 1, जांभेकरवाडी (मरळोशी) येथील 2, आडदेव येथील 1.
खटाव तालुक्यातील अंभेरी येथील 5, निमसोड येथील 1, कलेढोण येथील 2.
सातारा तालुक्यातील निगुडमळा (ग्रामपंचायत परळी) येथील 1,
वाई तालुक्यातील मुंगसेवाडी येथील 2.
जावळी तालुक्यातील आंबेघर येथील 2
आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 484 इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |