माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक सुख-दु:खाचे प्रसंग घडत असतात. त्यातून मानवप्राणी तावून सुलाखून निघतो. ज्यांच्याकडे धैर्य आहे, ते संकटाशी निकराने झुंज देतात. माझे दिवंगत वडील दीपक राव कांबळे हे आमच्यासाठी वडील व मित्र होते. आज त्यांना जावून दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. आजही त्यांच्या प्रतिमेकडे पाहिले तर ते कामावरुन आत्ता घरी येतील, असा भास होतो.
रेल्वेमध्ये बुकिंग क्लार्क ते गार्ड अशी जबाबदारी स्विकारताना त्यांच्यासोबत विविध ठिकाणी कुटूंबासह राहण्याचा योग आला. आमची आजी कोंडाबाई यांच्या चार मुलींनंतर मुलाचा जन्म झाला. वंशाचा दिवा म्हणजेच दीपक असे नामकरण करुन मोठ्या जिद्दीने कांजुरमार्ग याठिकाणच्या डॉकयार्ड कॉलनीमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेत माझ्या वडिलांचा प्रवेश झाला. मोठी बहीण शांताबाई खरात, मामा विश्राम जगताप, मामी वत्सला जगताप तसेच चुलतबंधू यांच्या सानिध्यात लहानाचा मोठे झाल्यानंतर माझ्या वडिलांनी महाविद्यालयात प्रवेश केला. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी मोठ्या संघर्षाने जीवन व्यतीत केले. या कालावधीमध्ये रेल्वेत सेवेत असणार्या त्यांच्या चुलतबंधू यशवंत कांबळे यांचे निधन झाल्यानंतर त्यांना रेल्वेमध्ये अनुकंपा तत्वावर नोकरी लागली. यावेळी आमची चुलती कुसूम यशवंत कांबळे यांनी या नोकरीसाठी संमती देवून आमचे कुटूंब उभे करण्यास हातभार लावला. हा वडिलांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. कन्नमवार नगर, विक्रोळी याठिकाणी 199 बिल्डिंगमधील तळमजल्यावरील फ्लॅटमध्ये आम्ही राहण्यास आलो. त्यापूर्वी माझ्या वडिलांचा विवाह माझ्या वडिलांचे मामा अॅड. के. आर. जगताप (सायगाव) यांची कन्या वैशाली यांच्यासोबत झाला. आम्ही चार बहिणी व एक भाऊ शुभम आणि आई असा आमचा परिवार वडिलांसोबत कायम होता. वडिलांची ज्याठिकाणी नोकरीनिमित्त बदली होईल त्याठिकाणी आम्ही राहत होतो. या कालावधीत आम्हाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणीवपूर्वक प्रवेश दिला. विक्रोळी, सातारा, उल्हासनगर, गुजरात, डोंबिवली याठिकाणी आमचे शिक्षण झाले. दुर्दैवाने आमच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले आणि आमचे कृपाछत्र हरपले. आम्हाला वडिलांचा खूप मोठा आधार होता. तो आधार नाहीसा झाल्यानंतर आमच्याही वाट्याला दु:ख आले. आज वडिल असते तर त्यांना आमचा खूप अभिमान वाटला असता, ही खंत कायमची मनात आहे.
आमच्या वडिलांनी आमच्यामध्ये जगामध्ये वावरताना धाडस व जिद्द निर्माण केली. त्याचा फायदा आमच्या सर्व भावंडांना होत आहे. त्यांनी आमचा खूप लाड केला. अनेक गोष्टी त्यांनी आमच्यासाठी विकत घेतल्या. तसेच काही गोष्टींचा त्यांनी त्याग केला. त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा होता. तसेच इतर नातेवाईकांचाही त्यात सहभाग होता. त्यामुळे नेहमी घर भरलेले असायचे. त्यांच्या पश्चात आज आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असलो तरी पप्पांची उणीव कायम भासत आहे. आज खर्याअर्थाने दहा वर्षाचा काळ आमच्यासाठी खूप मोठा काळ आहे. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची आठवण आमच्यासाठी ठेव आहे. आज दहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आम्ही आमच्या लाडक्या पप्पांना विनम्र अभिवादन करीत आहोत. सध्या लॉकडाऊनमुळे माझी आई श्रीमती वैशाली कांबळे, भाऊ शुभम सातारमध्ये आहेत. एक बहीण सौ. रिंकु तथा पूनम निखिल डांगळे व भाऊजी व भाचा दक्ष वापी ला आहेत. तर प्रियंका व प्रेरणा या दोघी बहिणी डोंबिवलीला आहेत. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी असलो तरी आज वडिलांच्या आठवणीने आम्ही एकत्र आलो आहोत. हा एकत्र ठेवा वडिलांच्या आशिर्वादामुळेच लाभला आहे. ते शरीराने आमच्यासोबत नसले तरी त्यांची आठवण कायम आमच्या स्मरणात राहणार आहे.
-पूजा दीपक कांबळे
सातारा.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |