मँचेस्टर : मँचेस्टरमध्ये होणारा भारत विरूद्ध इंग्लंड पाचवा कसोटी सामना कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे. बीबीसी टेस्ट मॅच स्पेशलनं ट्वीट केलंय की, ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर शुक्रवारी (10 सप्टेंबर) नियोजित असणारा पाचवा आणि अंतिम कसोटी सामना रद्द करण्यात आलाय. कारण कॅम्पमध्ये कोरोनाचे केसेस वाढण्याची भीती आहे.
ICC च्या माहितीनुसार, BCCI आणि ECB ने एकमेकांच्या सहमतीनेच हा सामना रद्द केलाय. ECB ने जारी केलेल्या पत्रकानुसार, "BCCI सोबत चर्चेनंतर ECB या वृत्ताला दुजोरा देतंय की, इंग्लंड आणि भारत यांमध्ये होणाऱ्या पाचव्या कसोटी सामना रद्द करण्यात येतोय. हा सामना ओल्ड ट्रॅफर्डवर खेळवला जाणार होता."भारत आपला संघ मैदानात उतरवण्यास असमर्थ असल्याचेही यात म्हटलं आहे. ECB ने क्रिकेटरसिकांची दिलगिरी व्यक्त करत म्हटलंय की, आम्हाला माहित आहे अनेकांची निराशा आणि असुविधा होईल.
रॉयटर्स वृत्तसेवा संस्थेनुसार, भारताचे फिजिओथेरेपिस्ट योगेश परमार यांना कोरोनाची लागण झालीय.कसोटी मालिकेच्या 5 सामन्यांमध्ये भारत 2-1 ने पुढे होता. टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्रींसह चौघांना कोरोनाची लागण 5 सप्टेंबर 2021 रोजी टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांची कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यावेळी शास्त्री यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील चार जणांना अलगीकरणात ठेवण्यात आलं होतं. शास्त्री यांच्यासह बोलिंग प्रशिक्षक बी.अरूण, फिल्डिंग प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजियोथेरपिस्ट नितिन पटेल यांना खबरदारीचा उपाय म्हणून अलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती बीसीसीआयनं प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली होती.
4 सप्टेंबरला शास्त्री यांची लॅटरल फ्लो अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांच्या जवळच्या संपर्कात असल्यानं अन्य तिघांनाही अलगीकरणात ठेवण्यात आलं होतं. चौघांचीही RT-PCR चाचणी करण्यात आली आहे. सध्या चौघंही टीम इंडियाच्या हॉटेलमध्येच आहेत. वैद्यकीय सल्लागारांनी पुढची माहिती दिल्याशिवाय त्यांना पुढे प्रवास करता येणार नाही.
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |