08:33pm | May 27, 2020 |
सातारा : सातारा जिल्ह्यात लॉक डाऊन जाहीर होऊन तब्बल तीन महिने पूर्ण झाली. या काळात विविध पक्षांची कार्यालयीन नेते, पदाधिकाऱ्यां शिवाय ओस पडल्यामुळे एकाही राजकीय पक्षाचा जाहीर कार्यक्रम जिल्ह्यात होऊ शकला नाही. अशा कार्यक्रमानंतर होणाऱ्या ओल्या-सुक्या पार्ट्यांना बहर यायचा. मात्र या मैफलीच्या बहरण्याला खुद्द कोरोनानेच खो घातल्यामुळे कार्यकर्ते कोरोनाच्या आयचा घो... अशा शिव्याशाप देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. थोडक्यात या तरुणाने सर्वसामान्य नागरिकांची नव्हे तर सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्त्यांची अक्षरशः दैना उडवून दिली आहे.
सातारा जिल्ह्याला स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा आहेत. त्यामुळे महाराष्ट्रभर या जिल्ह्याची ओळख विचारांचा जिल्हा अशीच आहे. या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना,भाजप आणि आरपीआय हे पक्ष विशेष कार्यरत आहेत. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रवादी भवन आणि काँग्रेसचे काँग्रेस कमिटी अशी दोन कार्यालये आहेत. पाच वर्षापूर्वी राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर पोवई नाका येथे शिवसेनेने मोठा गाजावाजा करून पक्षाचे कार्यालय उघडले होते, कालांतराने मात्र भाडे कोणी भरायचे या कारणावरून या कार्यालयाला कुलूप लावण्यात आले.
सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्यामुळे जिल्ह्यात नेहमी विविध मंत्र्यांसह पक्षाच्या बड्या नेत्यांचा वावर असत. मंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षीय मेळावे, पदाधिकाऱ्यांच्या बैठका, छोट्या खानी सभा होत असत. यातील बहुतांश कार्यक्रम हे राष्ट्रवादी भवन कार्यालयात होत असत. यापूर्वी कार्यालयात पक्षाचा मेळावा सुरू असताना त्याच्या तळमजल्यावर मात्र मटण बिर्याणीचा घमघमाट सुटत असत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांपेक्षा कार्यकर्त्यांनाच मेळावा केव्हा संपतोय याची उत्सुकता लागून राहत असत. महिन्यातून किमान एक तरी कार्यक्रम अशा पद्धतीने होत असल्यामुळे असे कार्यक्रम सातत्याने होवो अशी प्रार्थना जणू कार्यकर्ते करीत असत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्यांचा केंद्रबिंदू मात्र सातारा हाच राहत असे. साताऱ्यात एखादी सभा अथवा विशेष कार्यक्रम घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस राजकुमार पाटील यांच्या निवासस्थानी हे सर्व मंत्री मेजवानी झोडण्यासाठी येत असत. याची आठवण या निमित्ताने करावीशी वाटते.
याच्या अगदी उलट चित्र काँग्रेस कमिटीमध्ये पाहायला मिळायचे. याठिकाणी एखाद्या बैठकीनंतर चहा बिस्कीट यावरच समाधान भागवावे लागत होते. एखाद्या सभेच्या पार्श्वभूमीवर भोजनाचे आयोजन केलेच तर श्रीखंड पुरीवर समाधान मानावे लागत असे. शिवसेना भाजप या दोन्ही पक्षाच्या बैठका या शक्यतो महामार्ग लगत असणाऱ्या हॉटेलमध्ये होत असल्यामुळे बैठकीनंतर होणाऱ्या भोजनावळीत केवळ मान्यवरच दिसून येत. सध्या लॉक डाऊन असल्यामुळे राजकीय भोजनावळी अभावी राजकीय कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच दैना उडाली असल्याचे दिसून येत आहे.
साहेब, ताईंचे 'विकास नगर' प्रेम
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि जिल्ह्यात अष्टपैलू नेतृत्व म्हणून ज्यांचे आजही नाव घेतले ते स्व. लक्ष्मणराव पाटील (तात्या) यांची मैत्री संपूर्ण जिल्ह्याला नव्हे तर राज्याला परिचित होती. शरद पवार इतकाच त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा या पाटील घराण्याशी विशेष स्नेह आहे. लक्ष्मणराव पाटील हयात असताना शरद पवार आणि सुप्रिया ताई जेव्हा जेव्हा सातारा दौऱ्यावर यायचे तेव्हा तेव्हा हे दोघेही लक्ष्मणराव पाटील यांच्या विकास नगर, सातारा येथील निवासस्थानी भोजन करण्यासाठी जात असत. यावेळी लक्ष्मणराव पाटील हे शरद पवार, सुप्रिया सुळे या मान्यवर नेत्यांसह सर्वसामान्य कार्यकर्त्यांना प्रेमाने जेवायला वाढत असत. जोपर्यंत कार्यकर्ते पोटभर जेवत नाहीत तोपर्यंत लक्ष्मणराव पाटील जेवणाला हातही लावत नसत, ही आठवण सुद्धा या निमित्ताने अधोरेखित करावीशी वाटते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |