07:27pm | Jan 01, 2021 |
कराड : राज्यात राबविण्यात येत असलेल्या माझी वसुंधरा अभियानात समावेश असलेल्या रेठरे बुद्रूक गावात विविध मान्यवरांसह ग्रामस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणासाठी हरित शपथ घेतली.
दरम्यान, पर्यावरण संरक्षण, स्वच्छ सुंदर परिसर, वृक्षलागवड, सौर ऊर्जेचा वापर, हरित कायद्याचे पालन आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करून माझी वसुंधरा अभियान यशस्वी करावे, असे आवाहन गटविकास अधिकारी डॉ.आबासाहेब पवार यांनी केले.
रेठरे बुद्रूक ग्रामपंचायत, माझी वसुंधरा अभियान ग्रामकृती गट समिती आणि या अभियानासाठी नियुक्त स्वयंसेवी संस्था म्हणून ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत सभागृह, सौ.ताराबाई माधवराव मोहिते विद्यालय आणि जि.प.मराठी शाळा अशा तीन ठिकाणी हरित शपथ घेण्यात आली. यावेळी कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.आबासाहेब पवार, जि. प. सदस्या सौ.शामबाला घोडके, सरपंच सौ.सुवर्णा कापूरकर, उपसरपंच शिवाजी चव्हाण, ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष आनंदा थोरात, प्रकल्प समन्वयक बाजीराव पाटील, कृष्णा महाविद्यालयाचे डॉ.प्रा.स्नेहल राजहंस, डॉ.प्रा.व्ही.के.सोनवणे, तलाठी प्रशांत पाटील आदींसह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, मुख्याध्यापिका सौ.सुजाता पवार, विविध पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी, कृष्णा महाविद्यालयातील एन.सी.सी.चे विद्यार्थी आदींनी हरित शपथ घेण्यासाठी सहभाग घेतला.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या निर्णयानुसार पृथ्वी, वायू, जल, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत राबविण्यास सुरुवात झाली आहे. या अभियानात रेठरे ग्रामपंचायतीचा सहभाग असून वसुंधरेच्या प्रति आपली जबाबदारी म्हणून गावातील लोकप्रतिनिधींसह अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवत कोरोनाविषयक नियमांचे पालन करीत माझी वसुंधरा अभियांनांतर्गत पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने हरित शपथ घेतली. यामध्ये पर्यावरण संरक्षणाच्या सर्व नियमांचे पालन, मी माझे घर व परिसर स्वच्छ व सुंदर ठेवीन, घरातील ओला कचरा सुका कचरा प्लास्टिक कचरा यांचे वर्गीकरण करेन, मी उपलब्ध सर्व ठिकाणी वृक्षलागवड करेन व त्यांचे संगोपन करेन, पारंपरिक ऊर्जेचा वापर कमीत कमी करून सौरऊर्जेचा वापर करेन, घराच्या छतावरील पाणी जमिनीत मुरवून भूजलाच्या वाढीस मदत करेन, दैनंदिन जीवनामध्ये पर्यावरणपूरक साधनांचा वापर करेन, हरित कायद्याचे काटेकोरपणे पालन करेन, पर्यावरणास हानी पोहोचवणाऱ्या कामांना, व्यक्तींना वैधनिक मार्गाने विरोध करेन, माझे गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी वर्षातील शंभर तास स्वच्छतेसाठी देईन अशी शपथ घेतली.
डॉ.आबासाहेब पवार म्हणाले, निसर्गाशी असलेली कटीबद्धता निश्चित करण्यासाठी निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांवर पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच जैवविविधतेचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबण्याचा मार्ग म्हणून माझी वसुंधरा अभियान राबविले जात आहे. त्यासाठी 2 ऑक्टोबर ते 31 मार्च 2021 या कालावधीत विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत.
आनंदा थोरात म्हणाले, वृक्षारोपण, जलसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, निसर्गाचे संवर्धन, पर्यावरण सुधारणा व संरक्षण या मुद्यांवर प्रभावीपणे काम करुन रेठरे गावास प्रथम क्रमांक मिळण्यासाठी माझी वसुंधरा अभियानात सर्वांनी सक्रिय सहभागी व्हावे.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत घेतली हरित शपथ !
वर्षाच्या पहिल्या दिवशी कोरोनाविषयक नियमांचे पालन करून सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने हरित शपथ घेण्याचा उपक्रम राबविण्यात आला. तालुक्यात ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने हरित शपथ घेण्यात आली.
-डॉ.आबासाहेब पवार, गटविकास अधिकारी, कराड पंचायत समिती.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |