12:08pm | Jun 15, 2020 |
मुंबई: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सुशांतच्या आत्महत्येचे वृत्त ऐकून खिन्न झाला आहे. शोक व्यक्त करण्यासाठी त्याच्याकडे शब्द नाहीत, अशी माहिती धोनीचे मॅनेजर अरूण पांडे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुशांतच्या मृत्यूच्या घटनेवर अजूनही विश्वास बसत नाही. शोक कसा व्यक्त करावा हेच मला कळत नाहीये. ही घटना खूपच नाट्यमय आहे. सुशांत केवळ 34 वर्षांचा होता. प्रत्येकाच्या जीवनात चढउतार असतात, पण त्याच्या पुढ्यात एक उज्ज्वल भविष्य होतं याची मला खात्री होती. सुशांतच्या आत्महत्येचे वृत्त ऐकून माही (धोनी) खूपच खिन्न झाला. त्याच्या मृत्यूचा खूपच धक्का बसला आहे, अशी माहिती धोनीचे मॅनेजर अरूण पांडे यांनी एबीपी आनंद वाहिनीशी टेलिफोनवरून बोलताना दिली.
बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतने ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात प्रमुख भूमिका केली. धोनीच्या खेळीपासून ते धोनीच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या सवयीपर्यंत सुशांतने धोनीचा खूप चांगल्या पद्धतीने अभिनय केला. त्याच्या या अभिनयाची सार्यांनीच वाहवा केली. स्वत: धोनीनेदेखील त्याच्या अभिनयाच्या प्रेमात पडला होता. मोठ्या पडद्यावर स्वत:लाच बघताना मला खूप मजा आली अशा शब्दात धोनीने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. धोनीकडे नेतृत्व असलेल्या उडघ संघाच्या ट्विटर अकाऊंटवर सुशांतला श्रद्धांजली वाहिली. पण धोनीकडून कोणतीही प्रतिक्रिया रविवारच्या दिवसात आली नव्हती. अखेर सोमवरच्या दिवसात धोनीचे मॅनेजर अरूण पांडे यांनी सुशांतच्या मृत्यूनंतरच्या धोनीच्या भावना सांगितल्या.
शूटिंगदरम्यान मी सुशांतसोबत 18 महिने होतो. तो त्याच्या कामाप्रति समर्पित होता. जी भूमिका करायची होती, ती त्याने पूर्णपणे आत्मसात केली होती. धोनीची मैदानावरील छोटी-मोठी सवय हुबेहुब वठवण्यासाठी त्याने 9 महिने मैदानात सराव केला होता. तसेच धोनीसोबतही तो 15 दिवस राहिला होता. त्याने धोनीच्या भूमिका खूपच उत्तमरित्या पार पाडली होती. अभिनयासाठी सुशांत घेत असलेल्या मेहनतीवर धोनीसुद्धा खूप खुष होता, असेही धोनी चित्रपटाते निर्माते अरूण पांडे म्हणाले.
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |