पुसेगाव: सातारा जिल्ह्यात लौकिक असलेली आणि वर्षभर वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबविणारी शाळा अशी ओळख असलेल्या विसापूर जि.प.शाळेत (शैक्षणिक वर्ष 2021-22) इयत्ता पहिलीच्या प्रवेशप्रक्रियेस पाडव्याच्या मुहूर्तावर सुरुवात झाली. प्रवेशप्रक्रियेला जूनमध्ये सुरुवात होते, परंतु या शाळेत दरवर्षी पाडव्यादिवशी, ‘गुढीपाडवा, पट वाढवा’ अभियान राबवून विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित केला जातो. गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असल्यामुळे पालकही शाळेत प्रवेशासाठी उत्सुक असतात, म्हणूनच या वर्षी शेजारच्या पुसेगाव मधूनही काही विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश घेतला आहे.
कोरोनाच्या संकटातही शाळेतील शिक्षक ऑनलाईन शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या गृहभेटी घेऊन ऑफलाईन शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. चालू वर्षी शाळा सुरू होतील की नाही याबाबत साशंकता असली तरी विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिक्षण देता येईल याचे नियोजन सर्व शिक्षकांनी केले आहे. येथील पालक आणि ग्रामस्थही आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी जागरूक असतात आणि शिक्षकांना वेळोवेळी आवश्यक सहकार्य करतात, त्यामुळे पालक व शिक्षक योग्य समन्वयाने विद्यार्थी आणि पर्यायाने शाळेच्या उन्नतीसाठी झटत असतात.
जिल्हा परिषद शाळांमधून दर्जेदार शिक्षण मिळते, म्हणूनच या शाळांत शिकणारे विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झाल्याचे आपण पाहत आहोत. कोविड काळात योग्य नियोजन करून आम्ही सर्व शिक्षक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे मत यावेळी मुख्याध्यापक गंगाराम भुलूगडे यांनी व्यक्त केले. या प्रवेशप्रक्रियेचे नियोजन सहशिक्षक ज्ञानेश्वर धायगुडे, वैशाली नांदे, स्मिता शेळके, शुभांगी चव्हाण, वैशाली जाधव आणि रेश्मा बोडरे यांनी केले.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |