पुसेगाव : सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. खटाव तालुक्यात बहुतांशी ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाची सत्ता आहे. परंतु खटाव राष्ट्रवादीच्या नेत्यामध्ये एकसंघपणा नसल्या कारणाने व पक्षार्तंगत कुरघोडया असल्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून नेत्यांनी एकसंघ राहणे गरजेचे आहे, असे मत भुरकवडी गावचे माजी सरपंच संभाजीराव उर्फ एस. के. कदम यांनी व्यक्त केले.
भुरकवडी ता. खटाव येथे सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जनसंपर्क अभियान कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे, सातारा जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष प्रदिप विधाते, माजी जि प सदस्य प्रा.एन.एस उर्फ बंडा गोडसे, बाजार समितीचे कार्यकारी उपसभापती तुकाराम यादव, सरपंच छगनराव कदम, चेअरमन दिलीप कदम, शिवाजीराव कदम, मधुकर कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रवादीच्या जनसंपर्क अभियानात मार्गदर्शन करताना मोरे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडून गावातील अडीअडचणी विषयी माहिती घेऊन त्या पक्षाच्या माध्यमातून वरिष्ठांपर्यत पोहच करणार असल्याचे नमूद केले.
यावेळी प्रा.बंडा गोडसे म्हणाले की, आपल्या गावच्या निवडणुका या नेहमीच बिनविरोध करून या वेळेस ग्रामपंचायतीमध्ये सातही महिला सदस्या देऊन इतर गावासमोर आदर्श निर्माण केला आहे. आपला गाव नेहमी राष्ट्रवादीच्या पाठीशी राहिला असून आपल्या गावातील गट-तट विसरून सर्वांनी पक्षाचे कार्य करावे व गावचा विकास साधावा.
यावेळी माजी सैनिक कैलासराव जाधव, अंकुश लावंड यांचीही मनोगते झाली. यावेळी स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी माजी सैनिक चंद्रकांत कदम यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद कदम यांनी केले, तर आभार मनोजदादा कदम यांनी मानले. यावेळी प्रविण कदम, शहाजी कदम, नामदेव कदम, तानाजी कदम, शिवाजी कदम, जालींदर कदम, आप्पाजी कदम, राजेंद्र कदम, सयाजी कदम, संभाजी कदम, हणमंत कदम, भानुदास सस्ते, हिंदूराव चव्हाण, हणमंत गाढवे, आजी- माजी पदाधिकारी आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |