05:54pm | Sep 07, 2020 |
फलटण: धुमाळवाडी (ता.फलटण) येथे धबधबा पाहण्यासाठी आलेल्या मद्यधुंद युवकांनी गिरवी (ता.फलटण) येथील तीन दांम्पत्यांना शेतात गेले असताना त्या युवकांनी महिलांना पाण्याच्या डोहात ओढण्याचा प्रयत्न केला. यावेळी संबंधित महिलांच्या पतींनी युवकांना विरोध केला असता मद्यधुंद अवस्थेतील सात ते आठ युवकांनी त्या महिलांच्या पतींना घातक शस्त्राने व दगडाने बेदम मारहाण केली या मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी झाले असून तब्बल चोवीस तास उलटूनही फलटण ग्रामीण पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल न केल्याने, फलटण ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, काल रविवार दि.6 सप्टेंबर रोजी गिरवी (ता.फलटण) येथील तिघे दांम्पत्य म्हणजेच तीन महिला व त्यांचे पती धुमाळवाडी (ता.फलटण) येथे असणार्या त्यांच्या शेतात गेले होते. शेताला लागूनच धुमाळवाडी येथील प्रसिध्द धबधबा आहे. या धबधब्यावर फलटण तालुक्यातील सुमारे सात ते आठ युवक पर्यटनासाठी आले होते. यावेळी संबंधित युवक मद्यधुंद अवस्थेमध्ये होते. शेतात काम केल्यामुळे संबंधित महिला व त्यांचे पती हात पात धुण्यासाठी धबधब्याशेजारील डोहात गेले असता मद्यधुंद अवस्थेतील युवकांनी संबंधित महिलांचा हात पकडून त्यांना पाण्याचा ओढण्याचा प्रयत्न केला. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे महिला घाबरून पाण्याच्या बाहेर आल्या. उपस्थित असलेल्या त्या महिलांच्या पतींनी असे का केले? याचा जाब विचारला असता. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या युवकांनी तीक्ष्ण हत्यारे, लाकडी दांडके व दगडांच्या सहाय्याने त्या तिघींच्या पतींवर जीवघेणा हल्ला केला. या हल्यामध्ये महिलांचे पती गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर फलटण येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधित युवक फलटण तालुक्यातीलच असून यातील एका संशयित आरोपीला गिरवी व धुमाळवाडी येथील नागरिकांनी पकडून फलटण ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले होते मात्र फलटण पोलिसांनी त्या संबंधित आरोपीची वैद्यकीय चाचणी न करता त्याला परस्पर रात्रीच्या अंधारात सोडून दिल्याने या प्रकरणात ट्विस्ट वाढला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. फलटण तालुक्यातील धुमाळवाडी येथील धबधबा पर्यटनस्थळ असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून क्रीमीनल प्रोसीजर कोड 1973 ते कलम 173 नुसार धबधबा परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. असे असतानाही या ठिकाणी तीन दांम्पत्यांना मारहाण करणारे सात आठ जणांचे टोळके त्या ठिकाणी आलेच कसे? असा सवाल गिरवी व धुमाळवाडी येथील ग्रामस्थ करित आहेत.
या प्रकरणी काल संध्याकाळीच पिडीत महिला फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली असता त्यांची तक्रार यावेळी दाखल करून घेण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संशयित आरोपींना नागरिकांनी ताब्यात घेवून पोलिसांच्या स्वाधीन केले असतानाही पोलिसांनी या प्रकरणाचा योग्य तपास न करता फिर्यादीवरच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देवून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याने फलटण तालुक्यात प्रक्षुब्धतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सातारा जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक म्हणून एक महिला अधिकारी कार्यरत आहेत. असे असताना दिवसा ढवळ्या मद्यधुंद युवक महिलांच्या अंगावर हात टाकत असल्याने सातारा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी लक्ष घालून संबंधित संशयित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी फलटण येथील बार असोशिएशन तसेच विविध संघटनांच्या पदाधिकार्यांनी केलेली आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |