02:24pm | May 13, 2021 |
सातारा : सातारा जिल्हा विशेष शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री आठच्या सुमारास तारळ्यातील राजस्थानी व्यापाऱ्याच्या घरावर छापा टाकला. त्यात तब्बल 103 किलोंच्या जिलेटीनच्या स्फोटकांचा साठा जप्त केला. विहिरीच्या खुदाईसाठी वापरल्या जाणाऱ्या जिलेटीनच्या कांड्याचा साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. गोविंदसिंह राजपूत (वय 45, सध्या रा. तारळे) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.
याबाबत पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदसिंह राजपूत हा सहा वर्षांपासून तारळ्यात आहे. तो मूळचा राजस्थानचा आहे. विहीर खुदाईसाठी भागात ब्लास्टिंगचा त्याचा व्यवसाय आहे. त्याच्याकडे विहीर खुदाईचा परवानाही आहे. त्याने भागात अनेक विहिरींच्या खुदाईसाठी ब्लास्टिंग केले आहे. ब्लास्टिंगचा परवाना असला, तरी जिलेटनचा साठा करण्याची परवानगी नाही, तरीही त्याने साठा केला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना त्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा विशेष शाखेच्या पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रताप पाटील आणि त्यांच्या पथकाने तारळ्यात थेट छापा टाकून कारवाई केली.
गोविंदसिंह याच्या घरावर पोलिसांचा छापा टाकला. त्या वेळी त्याच्या घराची झडती घेण्यात आली. मात्र, साठा सापडला नाही. अखेर त्याच्या घरामागील न वापरले जाणारे स्वच्छतागृह पोलिसांनी तपासले. त्यावेळी तेथे खाकी रंगाचे चार बॉक्स आढळुन आले. या बॉक्सची तपासणी केली असता त्यामध्ये जिलेटीनच्या कांडया (स्फोटक पदार्थ) आढळुन आल्या. तसेच त्याच्या घरासमोर उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या बोलेरो या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये पाठीमागील बाजुस सिटच्या खाली एका निळया रंगाच्या पिशवीमध्ये २९ जिलेटीनच्या कांडया व दुसऱ्या निळया रंगाच्या पिशवीमध्ये २७ डीटोनेटर्स वायरसह आढळुन आले.
या संबंधाने सागर तानाजी भोसले, पोना/१०४३ ने.दहशतवाद विरोधी कक्ष सातारा यांनी यातील आरोपी गोविंदसिंह राजपूत विरुध्द स्वतःचे व लोकांच्या जिवितास धोका होऊ शकतो याची जाणीव असतानाही अधिकृत परवानगी शिवाय जाणीवपुर्वक जिवितास व मालमत्तेस गंभीर धोका पोहचु शकतो हे माहित असतानासुध्दा स्फोटक पदार्थांचा बेकायदेशीर साठा स्वतःजवळ बाळगुन लोकवस्तीमध्ये ठेवला म्हणुन दिलेल्या तक्रारी वरुन उंब्रज पोलीस ठाण्यात गु.र.नं.
२४७/२०२१ भादंसंक-२८६, स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ चे कलम ४,५, भारतीय स्फोटक कायदा १८८४ चे कलम ९(ब)(१)(ब) अन्वये तारळे ता.पाटण येथील गोविंदसिंग बाळुसिंग राजपुत (यादव) याच्या विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या गुन्हयामध्ये एकुण ९ हजार ४५३ रुपये किंमतीच्या एकुण ८३६ जिलेटीनच्या कांडया (स्फोटक पदार्थ-वजन अंदाजे १०३ किलो), ३ लाख रुपये किंमतीची पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी असा एकुण ३ लाख ९ हजार ४५३ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या छाप्यामुळे भागात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या कारवाईची भागात जोरात चर्चा आहे. जिलेटीनच्या स्फोटकांचा साठा लॉकडाउनच्या काळात गोविंदसिंहने कोठून उपलब्ध केला, त्याचा पोलिस तपास करत आहेत.
पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विशेष शाखा सातारा व दहशतवाद विरोधी कक्षा कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले, पोना सागर भोसले, पोकॉ सुमित मोरे, पोकॉ अनिकेत अहिवळे, पोकॉ केतन जाधव, पोकॉ निलेश बच्छाव हे या कारवाईत सहभागी झाले होते.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |