12:07am | Aug 17, 2020 |
फलटण : भारतीय जनता पक्ष सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्षपदी विष्णुपंत लोखंडे, शहराध्यक्षपदी अमोल सस्ते यांची नियुक्ती करण्यात आली असून तीनही नवनियुक्त पदाधिकारी यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
जयकुमार शिंदे भाजपा युवा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर याचे विश्वासू व निष्ठावंत सहकारी/मित्र म्हणून सातारा जिल्ह्यात व माढा मतदार संघात परिचित असून महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक पदावरुन सहकार तसेच राजकीय क्षेत्रात
उल्लेखनीय काम करणारे, सर्वांना बरोबर घेऊन जाणारे उमदे नेतृत्व म्हणून जयकुमार शिंदे यांचा नेहमीच आदर केला जातो.
केंद्रात भाजप सरकारच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री ना.अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी संपूर्ण देशात भाजप सरकारच्या माध्यमातून लोकांच्या हिताचे निर्णय घेत देशाची सर्वांगीण प्रगती केली आहे. त्यामुळे पक्ष संघटनेला लोकांच्या मनामध्ये खूप आदराचं स्थान असल्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे.
भाजप सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी सातारा जिल्हा उपाध्यक्ष पदी जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्षपदी विष्णुपंत लोखंडे, शहराध्यक्षपदी अमोल सस्ते यांची नियुक्ती केली आहे. जयकुमार शिंदे यांच्यावर फलटण व माण तालुका या दोन तालुक्याची जबाबदारी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून सोपविण्यात आली आहे. नवनियुक्त तीन उमदे सहकारी, पक्षातील अन्य सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना घेऊन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर सातारा जिल्ह्यात भाजप अधिक भक्कम व बळकट करतील असा विश्वास या निमित्ताने व्यक्त होत आहे.
पक्ष संघटनेने केंद्र सरकारच्यावतीने सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, सामान्य लोकांना केंद्रबिंदू कामे केली आहेत, केंद्राच्या योजना राबविताना, नव्या योजना सुरु करताना घेतलेली गेल्या काही वर्षातील भूमिका उपयुक्त ठरत असताना लोकांच्या प्रश्नांची माहिती व ते सोडविण्याची क्षमता असलेले लोकांना पक्ष संघटनेची जबाबदारी दिली जात असल्याने सातारा जिल्ह्यात याचा फायदा भाजपला होणार असून इथून पुढे होणाऱ्या सर्व निवडणुकीत भाजपला खूप मोठा जनाधार प्राप्त होणार असल्याचे यावेळी अनेकांनी बोलून दाखविले.
नवनियुक्त तालुकाध्यक्ष विष्णुपंत लोखंडे तालुक्याच्या पश्चिम भागातील एक अभ्यासू, होतकरु, कृतिशील कार्यकर्ता असून ग्रामीण भागात त्यांचा चांगला लोकसंपर्क आहे, ढवळ गावचे सरपंच म्हणून त्यांनी उत्तम काम केल्याने पंचायत समिती निवडणूकीत त्या भागातील लोकांनी त्यांना उत्स्फूर्त पाठींबा दिला होता. अमोल सस्ते सहकार, पर्यटन, बांधकाम, शेती क्षेत्रातील जाणकार आणि झोकून देऊन काम करणारे तरुण, तडफदार व्यक्तिमत्व असल्याने आगामी काळात फलटण शहरात भाजपच्या माध्यमातून ते एक नवी लोक चळवळ उभी करुन शहरवासीयांच्या प्रलंबीत प्रश्नांना गती देऊन त्यांची सोडवणूक करतील असा विश्वास त्यांच्या नियुक्तीपासून होत आहे.
फलटण व माण तालुक्यातील पक्ष संघटनेच्या सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेची वाटचाल गतिमान करण्याची ग्वाही यावेळी जयकुमार शिंदे यांच्यासह तालुक्यातील दोन्ही नवनियुक्त अध्यक्षांनी दिली आहे.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |