सातारा : तरडगाव, ता.फलटण येथे कार चालकाला थांबवून त्यांच्याकडील 5 लाख 34 हजार रुपयांची रोकड, मोबाईल असा मुद्देमाल जबरदस्तीने चोरणार्या टोळीवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली. सातारचे जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पुणे जिल्ह्यातील टोळीला दणका दिला असून 8 जणांचा त्यामध्ये समावेश आहे. दरम्यान, राजू जाधव (रा.माणगाव, हिंजवडी, पुणे) या टोळीचा म्होरक्या आहे.
राजू जाधव, प्रमोद उर्फ बारक्या पारसे, रोहन भालके, शिवा राठोड, पवन ओव्हाळ, विशाल शिरवले, दत्तात्रय शिरवले, कृष्णा चव्हाण (सर्व रा. हिंजवडी, पुणे) यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून सर्व संशयित अटकेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, यातील दोघे खंडाळा येथील कंपनीत कामाला होते. मटका, जुगाराचे व्यसन लागल्याने त्यांनी उधारी केली होती. उसने पैसे घेतलेले लोक वारंवार पैसे मागत असल्याने ते पैसे फेडण्यासाठी संशयितांनी पुणे येथील गुंडांना सुपारी देवून पैसे लुटण्याची आयडीया दिली. संबंधित कंपनीद्वारे रोख पैसे कामगारांना दिले जात असल्याने त्या पैशावरच दरोडा टाकण्याचा कट शिजवला. त्यानुसार दि. 9 सप्टेबर 2021 रोजी संबंधित टोळीने कार अडवून रोख साडेपाच लाख रुपयांवर दरोडा टाकला.
पुणे पोलिसांनी एका गुन्ह्यात कारवाई केल्यानंतर लोणंद पोलिस ठाण्यातील दरोड्याचा गुन्हा ओपन झाला. त्यानंतर पुढील कारवाई लोणंद पोलिसांनी इतर संशयितांना अटक केली. गेल्या महिन्यात घडलेल्या घटनेत पोलिसांनी दरोड्यातील बहुतांशी रक्कम जप्त केली आहे. पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर संबंधित टोळीवर पुणे जिल्ह्यात गुन्हे दाखल असल्याने त्यांचा मोक्का अंतर्गत प्रस्ताव तयार केला.
मोक्काचा प्रस्ताव तयार झाल्यानंतर पोलिस अधीक्षक अजयुमार बन्सल यांनी आयजी कार्यालयाकडून त्याला मंजुरी मिळवली व पुणे जिल्ह्यातील टोळीला मोक्का ठोकला.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |