सुरज लोहार, वडूज.
माणसाचे कर्तव्य हे कोणत्या जातीने किंवा विभागाने ठरत नसते. जो मार्ग निवडला आहे, त्या मार्गाने वाटचाल करताना निष्ठा महत्वाची असते. म्हणूनच मनसेचे अध्यक्ष व नेते राजसाहेब ठाकरे यांच्या राजकीय वाटचाल सातारचा बुलंद आवाज व मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांच्या सारख्या सुशिक्षित व गोरगरिबांना मदत करणारा निष्ठावंत शिलेदार जोडीला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात मनसे ची भरारी अनेकांच्या नजरेत भरत आहे.
गेल्या महिन्यात दि. 14 जून रोजी आदरणीय मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस व मनसे स्थापनेला 14वर्ष पूर्ण झाली. त्याच धर्तीवर मनसे निष्ठावंत युवराज पवार यांचा दि. 14 जुलै रोजी वाढदिवस साजरा होत आहे. हा योगायोग असून ऐतिहासिक घटना मध्ये ही चौदावे रत्न या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्थापने पासून श्रीराम भक्त हनुमानासारखे युवराजजी व सुरज लोहार ही दोन नावे राजकीय क्षितिजावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे प्रामाणिक भक्त म्हणून परिचित आहेत. सातारा जिल्हा म्हणजे छत्रपती शिवराय यांची राजधानी असल्याने जबाबदारी सांभाळताना नैतिक भान ठेवावे लागत आहे. सर्वसामान्य कुटुंबातील सदस्य असलेले युवराज पवार यांनी पक्षाच्या वाढीसाठी अनेक आंदोलने केली. त्यातून विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. पण, कधी ही त्यांनी इतर गुन्हे दाखल व्हावे असे कृत्य केले नाही, कष्टाच्या पैशातूनच वैभव निर्माण केले आहे. सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचा ‘फुलोरा’ पसरविला आहे. अडी-अडचणीला कोणाला सहकार्य हवे असेल तर युवराज पवार हेच नाव लोकांच्या नजरे समोर येत आहे. मनसे पक्षाच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, शाळा-महाविद्यालयात प्रवेश, बेरोजगार युवक मेळावा घेऊन नोकरीची संधी, कोरोना संकटात सापडलेल्या लोकांना अर्थ सहाय्याने दिलासा देण्यासाठी पदरमोड करून त्यांनी अनेकांना जगण्याचे बळ दिले आहे. राष्ट्रीय पातळीवर आपत्तीच्या वेळी स्वतः मदतीला धावून जाणार्या शिलेदार युवराज पवार यांच्या प्रेरणादायी कामगिरीने मनसे सैनिक सुध्दा मदतीसाठी रस्त्यावर उतरून सामाजिक बांधिलकी म्हणून काम करीत आहेत. त्यांना वाढदिवसानिमित्त सामाजिक, आध्यत्मिक, सहकार, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक तसेच महाराष्ट्रातील मनसे नेते, पदाधिकारी व मनसे सैनिक शुभेच्छा देण्यासाठी रात्रीपासून संपर्क साधत आहेत, ही त्यांच्या कार्याची पोहच पावती ठरली आहे.त्यांच्यावर सातारा जिल्ह्यातील मोठी जबाबदारी दिली तर ते निश्चितच त्याला न्याय देतील, असा विश्वास सातार्यातील मनसे पदाधिकारी व मनसे सैनिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे मनसे संघटनेतील निष्ठावंत त्या संधीची आतुरतेने वाट पहात आहेत, अशी चर्चा पश्चिम महाराष्ट्रात सुरू झाली आहे.त्यांना वाढदिवसाच्या मनसे हार्दिक शुभेच्छा...’
’सुरज’ ला दररोज उदयास येऊन इतरांना प्रकाशमान करण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात, त्याच प्रमाणे ’युवराज’ यांनी शीतल छाया देण्यासाठी चंद्र व्हावे,, कारण मनसे आमच्यासाठी आकाश आहे...
सुरज लोहार, (अध्यक्ष, मनसे, रोजगार विभाग, सातारा जिल्हा,) 9637868080
(शब्दांकन - अजित जगताप, सायगाव, सातारा) 9922241299
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |