वाई : तालुक्यातील मुगाव येथे डबरी नावाच्या शेतातील गवत रोटावेटरने या मशीनने काढत असताना आज सकाळी 8.45 वाजण्याच्या सुमारास मशीनमध्ये मान अडकून राजश्री अशोक रावडे (वय-49)यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे. त्यांच्या दुःखद घटनेमुळे मुगाववर शोककळा पसरली आहे. याबाबत वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चिखली ता. वाई येथील दिलीप रामचंद्र वाघ यांना गवत काढण्याचे रोटावेटर मशीन घेऊन मृत महिलेच्या घराशेजारील डबरी नावाच्या शिवारात गवत काढण्यासाठी बोलावले होते. शेतातील गवत काढत असताना सकाळी 8.45 वाजता रोटावेटर मशीनमध्ये जास्त गवत अडकले. रोटर चालक दिलीप वाघ यांनी रोटर मशीन थांबवली. राजश्री यांनी मशीन मधील गवत काढत असताना अचानक मशीन सुरू झाली त्यात राजश्री अडकल्या. त्यांना लगेच खाजगी वाहनाने वाई येथील गीतांजली हॉस्पिटलमध्ये आणले. परंतु तेथे डॉक्टर नसल्याने घोटावडेकर यांच्या हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. वाई पोलीस तपास करत आहेत.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |