सातारा : प्रसिद्ध सिने अभिनेता मिलिंद सोमण आणि रिमा संघवी यांनी सुमारे दोन वर्षापूर्वी हर घर पिंकथॉन स्पर्धा सुरु केली होती. यामध्ये महिलांची आरोग्यविषयक जागरुकता, ब्रेस्ट कॅन्सर विषयी महिलांमध्ये जागृती व्हावी, फिटनेस याबाबी या पिंकथॉन मोहिमेच्या माध्यमातून देशभर नव्हे तर जगभर मोठ्या प्रमाणावर राबविल्या जात आहे. या उदात्त हेतूने ही स्पर्धा जगभर भरवली जाते.
सुमारे 8 महिन्यांपूर्वी म्हणजेच 13 ऑक्टोबर 2019 मध्ये सातारा शहरामध्ये पिंकथॉन रन चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये सातारा शहर, कराड, फलटण, पाचगणी, वडूज, कोरेगाव, पाटण, जावली, वाई या तालुक्यातील सुमारे 4 हजार महिलांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा सातार्यातील पोलीस परेड ग्राऊंड ते मोळाचा ओढा या दरम्यान पार पडली होती. अतिशय नेटके नियोजन, उपस्थित असलेल्या महिलांना यावेळी फिटनेस कसा राखावा, आरोग्याची काळजी कशी करावी, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले होते. सातार्यातील हिरकणी फौंडेशनच्या संस्थापिका जयश्री शेलार यांनी अजित पाठक, सोनिया कुलकर्णी यांच्या सहकार्याने 2018 पासून सातारा शहरात पिंकथॉन रन चे आयोजन केले होते. 13 ऑक्टोबर 2019 रोजी दुसर्यांदा पिंकथॉन रन चे आयोजन करण्यात आले होते. या रन ला जिल्ह्यातील महिलांनी भरघोस प्रतिसाद दिला. त्यामुळे 12 देशांमध्ये घेण्यात आलेल्या पिंकथॉन रन मध्ये सातारा जिल्ह्यातील पिंकथॉन रन उजवी ठरली व सातारा शहराने या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन असताना सातारा शहरातील पिंकथॉन समिट ऑनलाईन घेण्यात आले होते. ज्यामध्ये फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून पिंकथॉनचे संस्थापक तसेच सातारा शहरातील सर्वच ऍम्बेसेडर महिलांची ऑनलाईन कॉन्फरन्स घेण्यात आली होती. यामध्ये सातारा शहराला बेस्ट सिटी, बेस्ट फोटो अल्बम द्वितीय क्रमांक, सर्वात जास्त रजिस्ट्रेशन, शाहू क्रिडा संकुल लोकेशन दुसरा क्रमांक, सर्वात जास्त महिला रनर्स सहभागी शहर, सर्वात चांगला फंडराईज व इव्हेंट मॅनेजिंग करणारे लोकेशन सातारा सिटी अशी एकूण सहा बक्षिसे मिळाली आहेत. या ऑनलाईन कॉन्फरन्समध्ये स्मिता कदम, वर्षा भोसले, डॉ. पल्लवी साठे, पल्लवी शिंदे, नितेश भोसले, विकास बहुलेकर, डॉ. शुभांगी गायकवाड, अपर्णा शिंगटे, संचिता तरडे, डॉ. रुपाली देशमुख, विद्या धुमाळ, ज्ञानेश्वरी निकम, तेजस्वी जाधव, शीतल आहेरराव, दिशा दिघे, नीलम चव्हाण, स्मिता पाटील, पुष्पा सकुंडे, तेजस्वी यादव, वाणी दास, सुमित नाईक, अमित कदम, स्मिता देशमुख, तेजश्री यादव, कराड तालुक्यातून प्रतिक्षा शेटे, सीमा राजपुरोहित, तर फलटणमधून प्रतिभा भिलारे यांनी ऍम्बेसेडर म्हणून या कॉन्फरन्समध्ये सहभाग घेतला होता. यावेळी पिंकथॉनचे संस्थापक अभिनेता मिलिंद सोमण यांनी सातारा जिल्ह्यासह बारा देशातील महिलांबरोबर व्हिडिओ कॉलिंगद्वारे संवाद साधून फिटनेस व आरोग्यासंबंधी मार्गदर्शन केले तसेच भविष्यात पिंकथॉन रन चे मोठ्या प्रमाणावर आयोजन करावे, असे आवाहनही केले. लॉक डाऊन नंतर सातार्यात येऊन आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहे, असे आश्वासनही दिले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |