03:15pm | Mar 14, 2022 |
पाटण : स्व. यशवंतराव चव्हाण यांनी राज्यातील अनेकांना पंचायत समिती, जिल्हा परिषद यामाध्यमातून शिक्षणाची संधी दिली. याच शिक्षणामुळे गावामध्ये, समाजामध्ये प्रगती झाली. पाटण पंचायत समितीच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षकांना दिला गेलेला पुरस्कार शिक्षण क्षेत्रात नवीन उर्जा निर्माण करेल, असे प्रतिपादन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
पंचायत समिती येथे सातारा जिल्हा परिषद व लोकनेते बाळासाहेब देसाई भवन पंचायत समिती (शिक्षण विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभ पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, प.स. सभापती राजाभाऊ शेलार, उपसभापती प्रतापराव देसाई, गटविकास अधिकारी मिना साळुंखे, तहसीलदार रमेश पाटील, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, प.स. सदस्य बबन कांबळे, उज्वला लोहार, रमेश मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. पाटील म्हणाले, पाटण तालुका हा भौगोलिक दृष्टीने फार मोठा आहे. या वर्षी पावसात झालेल्या नैसर्गिक आपत्तीत तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निसर्गाशी सातत्याने पाटण तालुका टक्कर देत आहे. अशा कठीण प्रसंगात लोकांना दिलासा देण्याचे काम शासनाकडून झाले आहे. पालकमंत्री या नात्याने पाटण तालुक्याला न्याय देण्याचा प्रयत्न मी केला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, पंचायत समिती, जिल्हा परिषद ग्रामीण भागाला जोडून ठेवतात. पंचायत समिती हा ग्रामीण भाग चालवणारा व शासकीय सेवा देणारा विभाग आहे. येथे जो काम करतो त्याला राजकारणाचा सर्व गाभा समजतो. सन १९८० च्या काळात शिक्षकांनी रस्ते नसताना वाडीवस्तीवर जाऊन ज्ञानदानाचे कार्य केले. दादांनी तालुक्यात रस्त्यांचे जाळे निर्माण केले. आजचा शिक्षक दुर्गम भागात जाऊन मुलांना ज्ञानदान करत आहेत. यापुढेही या शिक्षकांनी तालुक्यातील मुलांचा सर्वांगिण विकास कसा साधता येईल, याचा विचार करावा.
ते पुढे म्हणाले, पाटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्यासाठी पालकमंत्र्यांनी ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. महाआघाडी सरकारात आमचेही नेते आहे. या निधीमध्ये कोणी श्रेय घेऊ नका. माथे फिरवण्याचे कोण काम करत असेल; तर त्याकडे लक्ष देऊ नका. अतिवृष्टीचा निधी आहे. गाडीमध्ये पाट्या, नारळ घेऊन फक्त नारळ फोडत बसू नका. हा निधी दुःखासाठी आलेला आहे. याचे भांडवल करु नका, असा टोलाही ना. शंभूराज देसाई यांचे नाव न घेता लगावला.
सारंग पाटील म्हणाले, शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे. शिक्षण घेतले तर समाज प्रगत होईल. शेतीवरचा भार कमी करायचा असल्यास शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षणाने समाजात बदल घडतात. शिक्षणाचा समाजामध्ये प्रसार शिक्षक मंडळी करतात. सातारा जिल्ह्याची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक प्रगती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती यशवंतराव चव्हाण यांनी केली. चव्हाण साहेबांच्या संस्कृतीमध्ये घडलेला हा सातारा जिल्हा आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. सभापती राजाभाऊ शेलार यांनी मनोगत व्यक्त केले.
दरम्यान, पाटण तालुक्यातील ५५ प्राथमिक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी दीपा बोरकर यांनी केले. तर अर्जुन पाटील यांनी आभार मानले.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |
सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |