06:31pm | Sep 06, 2020 |
वाई : येथील कोविडं रुग्णालयात उपचार सुरु असणाऱ्या रुग्णाने आजाराला कंटाळून व नैराश्यातून रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य सेविकेला धक्काबुक्की व मारहाण करत पळून जाऊन कृष्णा नदी पात्रात उडी मारून आत्महत्या केली. संचित कोविड रुग्णालयानजीक आज दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत माहिती अशी आहे की, पाचवड (ता वाई) येथील 65 वयाच्या जेष्ठ नागरिक चाचणीमध्ये चार दिवसांपूर्वी करोना बाधीत असल्याचे आढळून आले होते. त्यांना वाई येथील संचित कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली होती. शनिवारी रात्री त्यांनी मुलाला फोन करून माझी प्रकृती उत्तम आहे मला आता घरी घेऊन जावा असे म्हणाले होते. मात्र त्यांना करोना आजारामुळे नैराश्य आले होते.त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा विचार बोलून दाखवला होता.पहाटे साडेचार च्या सुमारास त्यांनी रुग्णालयातून कृत्रिम प्राणवायूची यंत्रणा (ऑक्सिजन)काढून फेकून देऊन आरोग्य सेविका व डॉक्टरांना धक्काबुक्की करून पळून गेले. डॉक्टर आरोग्य सेविका कर्मचाऱ्यांना यांनी पीपी किट घातल्यामुळे त्यांच्या मागे पळता येत नव्हते.पहाटे डॉ विद्याधर घोटवडेकर याना माहिती दिल्यानंतर ताबडतोब डॉक्टरांनी रात्रगस्ती वरील पोलिसांच्या मदतीने पकडून रुग्णालयात आणले.त्यांना समजूत घालून त्यांना विश्राती घेण्याचा सल्ला दिला.या प्रकाराची नातेवाईकाना कल्पना देण्यात आली.पुढील उपचारात त्यांना खाटेला बँडेज पट्टीच्या साहाय्याने बंधन ठेवले होते. आपल्याला करोना झाला आहे याचे त्यांना वाईट वाटत होते. त्यांनी घरी सोडण्याची मागणी केली होती मात्र उपचार व इंजेक्शनचा डोस पूर्ण होई पर्यंत त्यांना घरी सोडणे शक्य नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.दोनतीन दिवसांनी त्यांना घरी सोडण्यात येणार होते. दरम्यान आज दुपारी त्यांनी पुन्हा कृत्रिम वायू (ऑक्सिजन) यंत्रणा काढून टाकली.त्यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी व सेविकांना त्यांना प्रतिबंध केला असता त्यांनी स्वतःच्या ताकदीने बँडेज पट्ट्या तोडून खाटेवरून उठून डॉक्टर व सेविकेला धक्काबुक्की व मारहाण करून संरक्षक दरवाजा तोडून रुग्णालयातून पळ काढला व लगतच्या कृष्णा नदी पात्रात उडी मारली.डॉ घोटवडेकर व सहकारी कर्मचार्यांनी नदी पात्रातून बाहेर काढून रुग्णालयातील कोविडं अतिदक्षता विभागात आणले.परंतु त्यांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. यावेळी गणपती घाटावर सिरीयलचे चित्रकरण सुरु असल्याने गर्दी होती.मात्र त्यांना कोणीही उडी मारण्यापासून रोखले नाही आणि नंतर पाण्यातून काढताना कोणी मदत केली नाही.केवळ बघ्यांची गर्दी होती.या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |