08:43pm | Sep 13, 2020 |
सातारा : सातार्यातील बांधकाम व्यावसायिक (बिल्डर) सचिन घनश्याम वाळवेकर यांना काळा पैसा स्वच्छ करुन देण्याचा बहाणा करत 1 कोटी 27 लाख 46 हजार रुपयांना गंडा घातला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहेे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात 13 संशयित आरोपींवर गुन्हा दाखल असून या घटनेने सातार्यातील बिल्डर लॉबीमध्ये खळबळ उडाली आहेे.
याबाबत पोलिसांनी दिलेली महिती अशी, सचिन वाळवेकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार मार्च 2018 पासून 15 ऑक्टोबर 2018 या कालावधीत सोलेमन, सिसो, पोटलाकोथबाने, एडवर्थ स्मिथ, बेल्सन्स, जॉर्ज, मॉरिस, योयोबो ईगरे, मॉरिस गोल्डबन, मॉर्गन, सॅम, अल्फेंड, डॉनियल (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाहीत) या संशयित आरोपींनी तक्रारदार यांना बांधकाम व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगितले.
त्यानंतर तक्रारदार यांनी लावलेले पैसे स्वच्छ करुन देण्यासाठी संशयित आरोपींनी तक्रारदाराकडून 1 कोटी 27 लाख 46 हजार रुपये वेळोवेळी घेतले. मात्र, त्यानंतर तक्रारदार वाळवेकर यांना फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. त्यांना पैसे परत न मिळाल्याने शेवटी त्यांनी 12 सप्टेंबर 2020 रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी याप्रकरणी 13 जणांवर गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याचा पुढील तपास सातारचे उपविभागीय अधिकारी सहाय्यक पोलीस अधिक्षक समीर शेख करत आहेत. दरम्यान, पूर्ण नाव, पत्ता माहिती नसलेल्या संशयितांना पकडण्याचे आव्हान आता सातारा पोलिसांसमोर आहे.
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |

लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |