काही माणसं ही समाज्याच्या भल्यासाठी जन्म घेतात आणि स्वकर्तुत्वाने दैवत प्राप्त करतात. अशा गुणी माणसांना काहीही कमी पडत नाही. प्रतिकूल परिस्थितीत प्रचंड कष्ट, प्रामाणिक मेहनत, मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी लागणारी जिद्द, याचा त्रिवेणी संगम म्हणजे वडूज नगरीचे आदरणीय डॉ.संतोष मोरे यांचा वर्षां अखेर दि. 31 डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. खरं म्हणजे नववर्षाचे स्वागत करण्यापूर्वी सज्ज झालेल्या दिवसाची भेट असावी. माणुसकीने ‘सदिच्छा’ देणारे व्यक्तिमत्त्व असणारे डॉ मोरे यांनी चिकाटी व गुणवत्तेच्या जोरावर शिक्षण घेतले. वडूज येथील ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी व माफक दरात व्यवसाय करीत समाजसेवेची जोड देत आहेत. सेवाभावी वृत्तीचे समाजसेवी डॉक्टर म्हणून त्यांची सातारा जिल्ह्यासह वडूज नगरीत ख्याती आहे.
खटाव तालुक्यातील वडूज शहरापासून नजिकच असलेल्या पेडगाव या गावात डॉ.संतोष मोरे यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण वडूज येथील हुतात्मा परशुराम विद्यालयात पूर्ण केले. वैद्यकीय क्षेत्रात भवितव्य करण्याचा मानस उराशी बाळगून डॉ. मोरे यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासाची सुरवात केली. ज्या प्रमाणे देशाच्या सीमेवर सैनिक हे देशाचे संरक्षण करतात त्याचप्रमाणे डॉक्टर हे आपल्या आरोग्याचे रक्षण करतात म्हणून समाजात डॉक्टरांना आदराचे स्थान कायम आहे. आपणही डॉक्टर होऊन आपल्या भागातील रुग्णांची सेवा करायची अशी मनस्वी जिद्द करून डॉ. मोरे यांनी सातारा येथील यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजला प्रवेश घेऊन त्यांनी आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरू केली. पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी बदामी (कर्नाटक) येथे त्यांनी प्रवेश घेतला. त्याठिकाणी वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून त्यांनी डॉक्टर पदवी संपादन केली. डॉ.मोरे यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर रूबी हॉल क्लिनीक पुणे येथे रूग्णसेवेस सुरूवात केली. वडूज व पेडगाव येथेही त्यांनी रूग्णसेवा केली. 2008 सालापासून वडूजच्या ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी आहे. वैद्यकीय व्यवसायाला त्यांनी कायमच समाजसेवेची जोड दिली आहे. जागतिक संकट कोरोना कालावधी सुरू झाल्यानंतर डॉ.मोरे यांच्यावर मोठी जबाबदारी होती. त्यांनी वडूज नगरीसह संपूर्ण खटाव तालुक्यात कोरोना संकट दूर करण्यासाठी जनजागृती व उपचार करून अनेकांचे आयुष्य वाढविण्याचा प्रयत्न केला. यासाठी ग्रामीण रुग्णालयातील सहकारी डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी वर्ग यांची मोलाची साथ दिली.
एक वेळा ते कोरोनाबाधित देखील झाले होते. पण, बाजीप्रभू देशपांडे यांच्यासारखी खिंड लढविताना त्यांनी स्वतःची ही काळजी घेतली. त्यातून बरे झाल्यानंतर त्यांनी आपली रूग्णसेवा पुन्हा नेटाने सुरू ठेवली. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धेचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखनाची आवड वृद्धींगत करण्यासाठी पाठबळ दिले होते. कोरोना काळात चांगल्या कामगिरीबद्दल तालुक्याच्या तत्कालीन तहसिलदार डॉ. अर्चना पाटील यांच्या हस्ते त्यांचा कोरोनायोध्दा म्हणून विशेष सन्मानही करण्यात आला होता. याशिवाय विविध सेवाभावी व सामाजिक संस्थांच्यावतीनेही त्यांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मानित करण्यात आले. ग्रामीण भागांतील लोकांच्या परिस्थितीची जाणीव डॉ.मोरे यांना कायमच आहे. त्यामुळे त्यांनी रूग्णसेवेकरिता माफक दरात उपचार उपलब्ध करून दिले आहेत. डॉ.मोरे यांचे सदिच्छा हॉस्पिटल हे सर्वसामान्य व गोरगरीब रूग्णांचे आधारवड ठरले आहे. डॉ.मोरे यांचे निदान व रूग्णावरील उपचार यामुळे रूग्णांना चांगला गुण येतो. त्यामुळे गोरगरीब व सर्वसामान्य रूग्णांचे डॉक्टर म्हणून त्यांची वेगळी ख्याती निर्माण झाली आहे.
डॉ.मोरे यांच्याकडून समाज्याच्या अपेक्षा वाढत आहेत. ही केलेल्या कार्याची पोहच पावती ठरली आहे. आगामी काळात अशीच निरंतर रूग्णसेवा त्यांच्या हातून घडावी ही सदिच्छा सामान्य माणसांची आहे. हिंदी चित्रपट क्षेत्रात एकेकाळी मिथुन चक्रवर्ती या अभिनेत्याला गरीब निर्मात्यांचे अमिताभ बच्चन असा उल्लेख करीत असत तशा पद्धतीने आपल्या सेवाभावी वृत्तीने डॉ.संतोष मोरे हे गरीब रुग्णांचे डॉ. नितु मांडके ठरले आहेत. हे मात्र खरे आहे. सातारा जिल्ह्यासह खटाव तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी ते सर्वसामान्य कुटुंबातील सदस्य त्यांच्याबद्दल गौरोद्गार काढत आहेत. याचा सर्वांना अभिमान आहे.
डॉ. मोरे यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत 0 ते 18 वयोगटातील मुलांच्या तपासण्या करून हृदयविकार, हर्निया, अपेंडीस अशा विविध शस्त्रक्रिया करून शेकडो विद्यार्थ्यांना आपल्या माध्यमातून मदत केली आहे. मोठ्या शहरातील रुग्णसुध्दा त्यांच्याकडे उपचार करून घेत आहेत. कारण, उपचाराची पद्धत व आपलेपणा यामुळे रुग्णांना संतोष वाटत असल्याने ते डॉ.मोरे यांच्याकडे उपचारासाठी येतात. अशी भावना रुग्ण व्यक्त करीत आहेत. ही खरं म्हणजे सामान्य रुग्णांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
- पत्रकार अजित जगताप, सातारा 9922241299
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |
सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |