सातारा : पतसंस्थेच्या सेव्हिंग खात्यावरील 43 लाख 3 हजार 790 रूपये स्वत:च्या फायद्यासाठी वापरून मुदतठेव पावत्यांच्या पैशाचा भरणा संस्थेत न भरता तो फायद्यासाठी वापरल्याने अंगापूर (ता.सातारा) येथील तीन जणांविरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2019 दरम्यान, अंगापूर ता.सातारा येथील गुरूवर्य ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या लेखापरीक्षणामध्ये हणमंत आनंदराव कणसे, अमोल गजानन काळे, अनिल किसन कणसे (सर्व रा.अंगापूर, ता.सातारा) यांनी एकत्रित संगनमताने बँक खात्यातून पैसे काढणे, त्या पैशाचा व्यवहारात फिर्यादीला न घेणे, ठेवीदारांच्या सेव्हिंग खात्यातील रकमा स्वत:च्या फायद्यासाठी वापरणे, मुदतठेव पावत्यांच्या पैशाचा भरणा संस्थेत न करता स्वत:च्या फायद्यासाठी वापरणे, एलआयसी तारण कर्ज, वाहन तारण कर्ज, कोणत्याही कागदपत्राशिवाय पैसे स्वत:च्या खात्यावर जमा करणे, अशी पतसंस्थेची एकूण 43 लाख 3 हजार 790 रूपयांची गैरव्यवहार करून सभासद , ठेवीदार व संस्थेची फसवणुक केली आहे. संस्थेच्या कामकाजात सेवकांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून संचालक मंडळाला अंधारात ठेवून मनमानी कारभार केलेला आहे. ठेवीदारांच्या तक्रारअर्जानुसार ठेवींच्या पैशाचा अपहार करून सभासदांची फसवणुक केली आहे. कर्मचार्यांनी केलेल्या आर्थिक बाबींची मासिक सभेत मंजुरी घेण्याबाबतचे प्रोसिडींग तपासकामी सादर न केल्याची तक्रार सौ.अनिता दत्ता उबाळे (रा.हिराबाई अपार्टमेंट, शाहुपुरी) या सातारा तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पो.हवा. देशमुख करीत आहेत.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |