12:06pm | Jul 04, 2022 |
सातारा (अजित जगताप) : कोयना धरणाच्या निर्मितीनंतर कोयना, सोळशी, कंदाटी असे भाग झाले. उपजीविकेसाठी विस्थापित व्हावे लागले. त्यातूनच एकनाथ शिंदे यांच्या रूपाने व कोयनेच्या त्यागातून महाराष्ट्राला लाभला आहे. आता संपूर्ण दरे परिसर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. विधिमंडळ अध्यक्ष पदाची निवडणूक जिकुंन या सरकारने दमदार सुरुवात केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जन्मभूमी दरे असली तरी कर्मभूमी ठाण्याने मोठे केले. शिवसेना सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे,कर्मवीर आनंद दिघे यांनी घडविले. आज ज्या भुमीने कौतुक केले, पाठबळ दिले. त्या जावळी खोऱ्यातील मावळ्यांना आनंद वाटत आहे. दरे ता महाबळेश्वर याठिकाणी स्वतः एकनाथ शिंदे यांनी दुःखाचेही अघात सहन केले आहेत. त्यानंतर अनेक वर्षे शिवसेनेच्या माध्यमातून ठाणे जिल्हा पिंजून काढला.अधूनमधून दरे गावात येणारे शिंदे अलीकडच्या काळात शेतीत रमून दरे गावात वारंवार येऊ लागले. राजकीय संघर्षाची वेळी सुरत नंतर गुवाहाटी प्रवासाच्या काळात दरे ग्रामस्थ पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. शिवसेना की एकनाथ शिंदे? या वादात न पडता ग्रामस्थांनी भाऊबंदकीलाच प्राधान्य दिले. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ संभाजी शिंदे यांनी शपथविधी घेतली आणि राज्यातील सामान्य राजकीय कार्यकर्त्यांना हत्तीचे बळ मिळाले आहे.
कितीही चाणक्य नीती डावपेच केले तरी बहुजन कार्यकर्त्यानी मागे पाऊल घ्यायाचे नाही. ही शिकवण मिळाली आहे. शेवटी सातारच्या सुपुत्रांनी एका बंडात नागपूर व बारामती, दिल्ली ला सुध्दा चितपट केले. ही ताकद छत्रपती शिवराय, छत्रपती शाहू महाराज संविधानाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांतून मिळाली आहे. धन्य ते गुरू शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आंनद दिघे व धन्य ते शिष्य एकनाथ शिंदे अशी आता घोषणा उदयास आली आहे. जावळी-महाबळेश्वर तालुक्यातील सामान्य शिवसैनिक महेश शिंदे, बबन शिंदे, रमेश शिंदे, आबा शिंदे व सुरेश मोरे,संतोष मालुसरे यांना मनस्वी आनंद झाला आहे. हा आनंदी क्षण पाहण्यासाठी आदरणीय भिलारचे स्वर्गीय बाळासाहेब भिलारे , देवापुरचे स्वर्गीय कोंडीबा जाधव ह्यात नाहीत. ही खंत अनेकांनी व्यक्त केली आहे. सध्या कंदाटी खोऱ्यातील दरे, गाढवली, अहिर ,पिंपरी या भागातील भाबडी जनता आतुरतेने वाट पहात आहेत. त्यांच्या साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळ दयावा. अन्यथा व्यक्ती पेक्षा पद पाहून मोठे पुष्पगुच्छ ,हार व जाहिरातबाजी करणाऱ्यांना निदान यावेळी दूर ठेवावे अशी अपेक्षा आहे
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |