09:36pm | Apr 14, 2021 |
सातारा : दीर्घकालीन आजारी असणाऱ्या आपल्या आईचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या मुलीला कोरोनाचे लक्षण असल्यामुळे आईचे अंत्यदर्शन व्हाट्सअप कॉलवर घेण्याची दुर्दैवी वेळ आली. नाती उद्ध्वस्त करणाऱ्या कोरोनामुळे जन्मदात्या आईचे अंत्यदर्शन व्हाट्सअप कॉलवरून घ्यावे लागल्याने तिला जबर मानसिक धक्का बसला आहे. १४ दिवस क्वारंटाइन राहण्याचा सल्ला वैद्यकीय पथकाने दिल्यामुळे स्वतःच्या आईच्या तिसऱ्यानेही तिला चकवा दिला. तिसराच काय दहाव्यालाही तिला उपस्थित राहता येणार नसल्यामुळे कधी जाणार हा कोरोना... लोकप्रतिनिधी तुम्ही काय करत आहात, असा टाहो तिने फोडला. स्वतःला कोरोना झाला आहे यापेक्षाही आईच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहता आले नाही, याचा तिला जबर मानसिक धक्का बसला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, पिरवाडी, (गोरखपूर) ता. सातारा येथील एका पस्तीस वर्षीय महिलेची कोरेगाव, ता. कोरेगाव येथील जुनीपेठ येथे राहणारी तिची आई गेले काही दिवस आजारामुळे अंथरुणाला खिळून होती. चार दिवसापूर्वी त्या महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे घडून आल्यामुळे तिच्यासह तिचा पती व मुलगा क्वारंटाइन झाले आहेत. दरम्यान, तिच्या आईचा आजारपणामुळे सोमवारी कोरेगाव येथे घरीच मृत्यू झाला. पिरवाडी येथील तिची मुलगी व कुटुंबीय सर्वच क्वारंटाइन असल्यामुळे कोणालाच आईच्या अंत्यसंस्काराला जाता न आल्यामुळे तिच्या मुलीने फोडलेला टाहो अंगावर काटा, शहारा आणणारा ठरला. ज्या आईने चांगले संस्कार केले. खूप लाड केले. प्रसंगी स्वतः उपाशी राहून घास भरवले.
खूप शिकवले... योग्य ठिकाणी विवाह करून दिला, त्या माऊलीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहता आले नाही एवढेच नव्हे तर तिचे अंत्यदर्शनही घेता आले नाही, ही वेदना मनाला चटका लावून जाणारी ठरली. कसला हा कोरोना, नाती उध्वस्त करणारा... माणसातून माणसाला पूर्ण उठवणारा कोरोना केव्हा जाणार? काय करताहेत लोकप्रतिनिधी? असा उद्विग्न सवाल उपस्थित करत तिने फोडलेला टाहो पाहून कुटुंबीय पुरते हादरून गेले.
दरम्यान, त्या महिलेची बहीण गौरी उत्तम कदम रा. जायगाव, ता. कोरेगाव हिने व्हाट्सअप कॉल करून तिच्या बहिणीच्या आईचे अंत्यदर्शन करून दिले. व्हाट्सअपवर का होईना आईचे अंत्यदर्शन झाल्यानंतरही संबंधित महिला अद्यापही त्या धक्क्यातून सावरले नाही. तिसराच का दहाव्यालाही उपस्थित राहता येणार नसल्यामुळे तिने फोडलेला टाहो आसमंतातील विजेचा कडकडाट पेक्षाही फार मोठा ठरला. यानिमित्ताने कोरोना काय आहे? त्याची तीव्रता किती भयंकर आहे, आपण स्वतःची कितीही काळजी घेतली पाहिजे, हेच या घटनेवरून स्पष्ट होते.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |